कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दुबई येथील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. हे दोघे मेकॅनिकल विभागात अंतिम वर्षात शिकत आहेत. वार्षिक 9 लाख 60 हजार रुपयांचे पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांच्या हस्ते आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ.महादेव नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभेच्छ देताना डॉ पाटील म्हणाले की, पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांची निवड निश्चित कौतुकास्पद आहे. या संधीचे सोने करून स्वतःचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवा.

डॉ. गुप्ता यांनी यापुढील काळातही विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील असे नमूद केले. पॉलिटेक्निकमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन, क्षकांचे मार्गदर्शन हे या यशाचे गमक असल्याचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रा.नितीन माळी यांनी आभार मानले.