कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नवीन शैक्षणिक धोरणा (NEP 2020) नुसार डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये ‘रुरल सोशल एंट्रन्सशिप’चा समावेश केला आहे. याअंतर्गत प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खेडेगावांमध्ये जाऊन ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करून तेथील समस्या जाणून घेतल्या.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्याची एंट्रन्सशिप ठेवण्यात आली आहे. या रुरल सोशल एंट्रन्सशिप मध्ये विद्यार्थ्यानी ग्रामपंचायत कार्यालय, सेतू कार्यालय, शाळा, लघुउद्योग, महिला बचत गट, वाचनालय, आरोग्य सेवा केंद्र या ठिकाणी भेटी दिल्या. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये सर्व्हे केला.

यामध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण, इलेक्ट्रिकल वाहनाचा वापर, ऑनलाइन पेमेंट सिस्टीम आदी माहिती गोळा करण्यात आली. गावामध्ये असणाऱ्या समस्यांचा अहवाल बनून त्यावर उपायोजना शोधल्या जाणार आहेत. हा अहवाल ग्रामपंचायत कार्यालय तसेच वरिष्ठ कार्यालयामध्ये जमा केला जाणार आहे.

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रुरल सोशल एंट्रन्सशिप अमलात आणणारे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज आहे अशी माहिती डी वाय पाटील ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. ए के गुप्ता यांनी दिली. रुरल सोशल एंट्रन्सशिप मध्ये डी वाय पाटील इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष विभागात शिक्षण घेणाऱ्या एकूण 1475 विद्यार्थ्यांनी सहभाग होता. कोल्हापूर शहराजवळील 50 गावांमध्ये विद्यार्थ्यांनी एंट्रन्सशिप केल्याचे त्यांनी सांगितले.