कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू आणि ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रकाश बेहेरे यांचे गुरुवारी रात्री सेवाग्राम येथे निधन झाले. 8 जून 2016 ते 10 मे 2019 या कालावधीत त्यांनी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू म्हणून प्रभावी कामगिरी केली.

त्यांच्या कार्यकाळात हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाला नोंदणी मिळाली, तसेच फॅमिली अॅडोब्शनची प्रक्रियाही सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने नकच्या सेकंड सायकलमध्ये ‘ए’ मानांकन प्राप्त केले. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठात अनेक नवे अभ्यासक्रम सुरू झाले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये त्यांचा सहभाग होता.

डॉ. बेहेरे यांच्या निधनाबद्दल विद्यापीठच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुद्गल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.