कोलोलीतील भैरव सेवा संस्थेचे ११७ सभासद रद्द

कोतोली (प्रतिनिधी) : कोलोली (ता. पन्हाळा) येथील भैरव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे ११७ सभासद अपात्र असल्याचे आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी दिल्याची माहिती अॅड. अमोल पाटील यांनी दिली. यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.   संस्थेचे सभासद मुरारी तुकाराम पाटील यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. संस्थेच्या सत्तारूढ… Continue reading कोलोलीतील भैरव सेवा संस्थेचे ११७ सभासद रद्द

मेघोली दुर्घटना : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, महसुल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असेल, तर ती स्वीकारणार नाही. योग्य मोबदला मिळणार असेल, तरच पंचनामे करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी आज (शनिवार) खासदार, आमदार, अधिकारी यांच्यासमोर घेतला. … Continue reading मेघोली दुर्घटना : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

पालकमंत्र्यांकडून मेघोली धरणस्थळाची पाहणी   

कडगाव (प्रतिनिधी ) :  भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) सकाळी मेघोली धरणाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एक महिला मृत्युमुखी पडली आहे. तर काही जनावरे वाहून गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने… Continue reading पालकमंत्र्यांकडून मेघोली धरणस्थळाची पाहणी   

१५ टक्के शैक्षणिक फी माफी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून नागरिकांचे आर्थिक  गणित विस्कळीत झाल्याने राज्य शासनाने शालेय शैक्षणिक फीमध्ये १५ टक्के माफीचे आदेश काढले आहेत. परंतु, याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कोणत्याही शाळेमध्ये होत नसल्याने पालकांची आर्थिक कुचबंणा होत आहे. तरी तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आज (शुक्रवार) कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली. याबाबतचे निवेदन… Continue reading १५ टक्के शैक्षणिक फी माफी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी  

नुकसान भरपाई, अनुदान देण्यासाठी शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? असा उपरोधिक सवाल शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. गौरी-गणपती, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोना… Continue reading नुकसान भरपाई, अनुदान देण्यासाठी शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? : समरजितसिंह घाटगे

मंत्री हसन मुश्रीफांनी धर्मसंस्थेला सदैव पाठबळ दिले : महेशानंद महाराज

कागल, (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाचशेहून अधिक मंदिरांच्या बांधकामामध्ये योगदान दिले आहे. या माध्यमातून त्यांनी धर्मसंस्थेला सदैव पाठबळ दिल्याचे गौरवोद्गार श्री. भक्तीयोग आश्रम हंचनाळ, तारदाळ व  मळणगावचे मठाधिपती प. पू. महेशानंद महास्वामीजी महाराज यांनी काढले. कागलमध्ये कोष्टी गल्लीतील श्री. महादेव मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात ते बोलत होते. येथील कोष्टी गल्लीत हेमाडपंती पद्धतीने बांधलेल्या… Continue reading मंत्री हसन मुश्रीफांनी धर्मसंस्थेला सदैव पाठबळ दिले : महेशानंद महाराज

मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. खा. संभाजीराजे म्हणाले की, १०५ व्या… Continue reading मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट…

यंदाही राशिवडे येथे गणेशोत्सव साधेपणाने : प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे बुद्रुक येथे आज (गुरुवार) गणेशोत्सवा संदर्भात राधानगरी पोलीसांनी सार्वजनिक मंडळांची बैठक घेतली. यामध्ये राधानगरीचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी गणेश मंडळांना कोरोनाचे सावट असल्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. पोलीस प्रशासनाच्या नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करून सामाजिक हित जपावे, असे आवाहन केले. राधानगरी तालुक्यात राशिवडे येथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.… Continue reading यंदाही राशिवडे येथे गणेशोत्सव साधेपणाने : प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

येवती येथे सैनिक संघटनेचे कार्य आदर्शवत : कर्नल संजय सरनाईक

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : येवती (ता. करवीर) येथील विद्या मंदिर शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने सामाजिक कृतज्ञतेतून कमान उभारणीचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार कमांडिंग ऑफिसर मराठा बटालियन एनसीसीचे कर्नल संजय सरनाईक यांनी काढले. शाळा कमानीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना आजच्या तरुणांनी एनसीसी प्रशिक्षण व सैनिक भरतीसाठी… Continue reading येवती येथे सैनिक संघटनेचे कार्य आदर्शवत : कर्नल संजय सरनाईक

वीजमीटर रिडिंगमध्ये हयगय झाल्यास ‘मोठी’ कारवाई : महावितरणचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) : वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रिडींग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रिडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल व महावितरणमध्ये कोणत्याही ठिकाणी… Continue reading वीजमीटर रिडिंगमध्ये हयगय झाल्यास ‘मोठी’ कारवाई : महावितरणचा इशारा

error: Content is protected !!