दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : येवती (ता. करवीर) येथील विद्या मंदिर शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने सामाजिक कृतज्ञतेतून कमान उभारणीचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार कमांडिंग ऑफिसर मराठा बटालियन एनसीसीचे कर्नल संजय सरनाईक यांनी काढले. शाळा कमानीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आजच्या तरुणांनी एनसीसी प्रशिक्षण व सैनिक भरतीसाठी आवश्यक तयारी कशी करावी, याबाबत पालक व तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले.  शाळा कमान उभारणीसाठी योगदान दिलेल्या सर्व आजी – माजी सैनिकांचा शाळेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सुभेदार मेजर विठ्ठल वडींगेकर, सुभेदार बाबुराव कांबळे, नायक योगेश कुमार, सरपंच वीरधवल पाटील, उपसरपंच संतोष कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पाटील, आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती करवीर शिक्षण विभागाचे पदाधिकारी, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शाळेचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कुर्डूकर यांनी केले. सूत्रसंचालन युवराज पाटील  यांनी केले.