कडगाव (प्रतिनिधी ) :  भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) सकाळी मेघोली धरणाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एक महिला मृत्युमुखी पडली आहे. तर काही जनावरे वाहून गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने  भरपाई दिली जाईल.  धरणाची पुर्नबांधणी करण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर,  उपसभापती सत्यजित जाधव, तहसीलदार वरुटे,  सर्व विभागाचे अधिकारी व मेघोली, सोनुर्ली, वेंगरुळसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.