कोतोली (प्रतिनिधी) : कोलोली (ता. पन्हाळा) येथील भैरव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे ११७ सभासद अपात्र असल्याचे आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी दिल्याची माहिती अॅड. अमोल पाटील यांनी दिली. यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.  

संस्थेचे सभासद मुरारी तुकाराम पाटील यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. संस्थेच्या सत्तारूढ गटाने बेकायदेशीरपणे पोटनियमाप्रमाणे किमान १० गुंठे क्षेत्र धारण करीत नसलेल्या व्यक्तींना सभासद बहाल केल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीवरून सहकारी खात्यासमोर सुनावणी होऊन सहकार खात्याने भैरव संस्थेचे ११७ सभासद अपात्र असल्याचे आदेश दिले.