राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे बुद्रुक येथे आज (गुरुवार) गणेशोत्सवा संदर्भात राधानगरी पोलीसांनी सार्वजनिक मंडळांची बैठक घेतली. यामध्ये राधानगरीचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी गणेश मंडळांना कोरोनाचे सावट असल्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. पोलीस प्रशासनाच्या नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करून सामाजिक हित जपावे, असे आवाहन केले.

राधानगरी तालुक्यात राशिवडे येथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. राशिवडे ग्रामस्थांनी नेहमीच प्रशासनासाठी समर्पक भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे या ही वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राधानगरी पोलीसांनी कौतुक केले आहे.

यावेळी ग्रा.पं.चे पदाधिकारी अनिल वाडकर, अतुल पाटील, जयसिंग पाटील, रंगराव चौगुले, राधानगरी पोलीस ठाण्यातील कृष्णात यादव, राहुल पाटील,पोलीस पाटील उत्तम पाटील उपस्थित होते.