मी घोड्यावर बसलो की…अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला

पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार प्रचाराचा धुरळा उडवत आहेत.मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. असेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे गावोगावी प्रचार करत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये घोड्यावरुन प्रचार केल्यानं ते चर्चेत आले होते. यावेळीदेखील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी घोड्यावरून प्रचारासाठी आलेल्या अमोल… Continue reading मी घोड्यावर बसलो की…अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला

शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

xr:d:DAGBvDLPx-E:13,j:2192551245816385282,t:24040713

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये उमेदवारीवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. अपेक्षितरित्या संधी मिळत नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh… Continue reading शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

भाजप स्थापना दिनानिमित्त पुणे शहरात आज घर चलो अभियान

xr:d:DAGBuAWTxJo:10,j:1497870986249548108,t:24040709

पुणे ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा पुणे शहराच्या माध्यमातून आज घर चलो अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी भाजपाचा ध्वज फडकावून स्थापना दिन साजरा केला. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, हा भारतीय जनता पार्टीचा… Continue reading भाजप स्थापना दिनानिमित्त पुणे शहरात आज घर चलो अभियान

सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. येथील विविध मतदारसंघांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान भाजपा सेवा प्रकोष्टच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील… Continue reading सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे : मंत्री चंद्रकांत पाटील

मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पुणे शहर कार्यालयात भाजपा उत्तर आणि दक्षिण भारतीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुण्यातील स्थायिक उत्तर आणि दक्षिण भारतीय नागरिकांच्या आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. चंद्रकांत… Continue reading मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे : मंत्री चंद्रकांत पाटील

कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे  : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रचाराचे घमासान सुरू झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील उत्तर कोथरूड भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन केले. ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, नेत्यांची इच्छा ही आज्ञाच. त्यामुळे… Continue reading कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे  : मंत्री चंद्रकांत पाटील

लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे 400+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा… Continue reading लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे ( प्रतिनिधी ) राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमान महाराष्ट्राच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत पाटील ! भारतीय जनता… Continue reading संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना… Continue reading समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

पुणे ( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.तिथीनुसार आज सर्वत्र… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

error: Content is protected !!