पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये उमेदवारीवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. अपेक्षितरित्या संधी मिळत नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) पुन्हा उमेदवारी दिल्यानं महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून होतं. यातच आता कोकोटे यांनी मोठा निर्णय घेत आता हातात तुतारी घेतली आहे.

जयंत पाटील यांनी संजय कोकाटे यांचे पक्षात स्वागत करत तुम्ही जर पक्ष संघटना बळकट केली तर तुमच्याशिवाय तिथं कोणी नाही असे जयंत पाटील म्हणाले. तुम्ही जर बुथ लेवलपर्यंत संघटना बळकट केली तर तुमचाच सुर्य तुतारीच्या निनादाने उगवेल असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच वाजणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.