पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच, समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचनाही भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी पाटील यांनी दिल्या.

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, पक्षाचे शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, राघवेंद्र बाप्पू मानकर, पुनीत जोशी, ओबीसी मोर्चा शहराचे अध्यक्ष नामदेव माळवदे, स्मिताताई गायकवाड, तसेच ओबीसी मोर्चा प्रदेशाचे आणि शहराचे सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.