कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम ४ डिसेंबरपासून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील फुटबॉल स्पर्धेचा हंगाम येत्या चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमुळे कोल्हापूर फुटबॉलमय झाल्याने स्थानिक खेळाडू आणि शौकिनांचा जोश वाढला आहे. शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी १६ संघ मैदानात उतरणार आहेत. सीनियर सुपर ८ व सुपर… Continue reading कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम ४ डिसेंबरपासून

एस. के. पाटील महाविद्यालयास व्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील एस. के. पाटील महाविद्यालयात झालेल्या कोल्हापूर झोनल व्हॉलीबॉल स्पर्धेत एस. के. पाटील महाविद्यालय संघाने प्रथम क्रमांक मिळविला व अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळ करत बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आंतर विभागीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून कुरुंदवाडच्या व्हॉलीबॉलच्या खेळाची परंपरा कायम ठेवली. या संघामधून शिवाजी… Continue reading एस. के. पाटील महाविद्यालयास व्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

पहिल्याच सामन्यात मेस्सीचा अर्जेंटिना पराभूत

कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक फुटबाल स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याच्या अर्जेंटिना संघाला दुबळ्या सौदी अरेबिया संघाकडून २-१ च्या फरकाने पराभूत व्हावे लागले. फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी सर्वात मोठी उलटफेर झाला. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ‘क’ गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला. १० व्या… Continue reading पहिल्याच सामन्यात मेस्सीचा अर्जेंटिना पराभूत

भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली; पावसामुळे सामना अनिर्णीत

नेपियर (वृत्तसंस्था) : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. दरम्यान, सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर होत असते; पण एकही चेंडू टाकायला वाव नसल्याने… Continue reading भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली; पावसामुळे सामना अनिर्णीत

महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येथे ५५ वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांंनी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. यावेळी नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर, तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खो-खो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली… Continue reading महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी

रोहित शर्माची ११ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी सत्यात

मुंबई (प्रतिनिधी) : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने ११ वर्षापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती. सध्या रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग नाही, तो सध्या विश्रांती घेत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरु असताना रोहित शर्माचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबाबत ११ वर्षांपूर्वी एक मोठी भविष्यवाणी… Continue reading रोहित शर्माची ११ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी सत्यात

बुद्धिबळ स्पर्धेत राशिवडे येथील नागेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

राशिवडे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय क्रीडा विभागाच्या वतीने तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये विविध वयोगटांमध्ये नागेश्वर हायस्कूलच्या ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये चौदा वर्षाखालील मुलामुलींच्याच गटामध्ये शुभम लाड, सुदर्शन पाटील, शर्वरी कांबळे, प्राजक्ता पाटील, सिद्धी पाटील, धनिष्ठा पाटील यांनी यश मिळवले. तर सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या गटामध्ये सुरज बिल्ले,… Continue reading बुद्धिबळ स्पर्धेत राशिवडे येथील नागेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

कतार येथे रविवारपासून ‘फिफा विश्वचषक’फुटबॉल स्पर्धा

कतार (वृत्तसंस्था) : रविवारपासून कतार येथे सुरू होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तब्बल ३२ संघांचा सहभाग असून, जगभरातील फुटबॉल रसिकांना आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. गतविजेत्या फ्रान्सचा जेतेपद आपल्याकडेच राखण्याचा मानस असला, तरी अन्य संघ त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावत विश्वचषकावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करतील. चार वर्षांपूर्वी रशियात झालेल्या ‘फिफा’ विश्वचषकाचे फ्रान्सने जेतेपद पटकावले… Continue reading कतार येथे रविवारपासून ‘फिफा विश्वचषक’फुटबॉल स्पर्धा

फुटबॉल वेडे कोल्हापूरकर

कोल्हापूर (प्रातिनिधी) :  फुटबॉल वेडे कोल्हापूर शहर अशी कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोल्हापूरच्या फुटबॉलबद्दल चर्चा असते. कोल्हापूरचे तरुण हे आपल्या भारतीय खेळाडूंबरोबरच बाहेरच्या देशातील खेळाडूंचे देखील समर्थक आहेत. आपल्या स्टार खेळाडूप्रती असणारे प्रेम दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करत असतात. २० नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर… Continue reading फुटबॉल वेडे कोल्हापूरकर

पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी-२० सामना होणार होता; पण या सामन्यावर पावसाने पाणी फिरवले आहे. पावसामुळे नाणेफेकसुद्धा होऊ शकली नाही. बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेलिंग्टनध्ये नाणेफेकच्या वेळी पाऊस सुरु झाला. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू इंडोर फुटबॉल खेळताना दिसले. एकवेळ असे वाटत होते की, पाऊस थांबेल… Continue reading पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द

error: Content is protected !!