फिफा वर्ल्डकप दिग्गज फुटबॉलपटूंसाठी अखेरचा 

कतार (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात मोठा फिफा वर्ल्डकप रविवार, दि. २० नोव्हेंबरपासून सुरु होत असून, यात ३२ संघ सहभागी होणार आहेत. २९ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६४ सामने खेळले जाणार आहेत. मुख्य म्हणजे प्रथमच मध्य पूर्वेतील देशात म्हणजे कतारमध्ये त्याचे आयोजन केले गेले आहे; परंतु अनेक दिग्गज खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्डकप ठरण्याची शक्यता आहे. लियोनेल… Continue reading फिफा वर्ल्डकप दिग्गज फुटबॉलपटूंसाठी अखेरचा 

धोनी होणार भारतीय संघाचा मार्गदर्शक

दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघाने क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनी छोट्या प्रकारामध्ये संघाचा मार्गदर्शक म्हणून टीम इंडियात परत येऊ शकतो. त्यामुळे धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी… Continue reading धोनी होणार भारतीय संघाचा मार्गदर्शक

रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनचे सांघिक यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगाव येथे पार पडलेल्या रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१७० च्या वार्षिक क्रीडा आणि  सांस्कृतिक स्पर्धेत रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील विविध रोट्रॅक्ट क्लबसच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. क्रीडा प्रकारात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, १०० मी. धावणे, १०० मी.… Continue reading रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनचे सांघिक यश

धोनीसारखे तीन विजेतेपद मिळवून देणे अशक्य : गौतम गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘धोनीसारखे तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणे कुठल्या भारतीय कॅप्टनला जमणार असे वाटत नाही’ असे गंभीर म्हणाला. कदाचित कोणी रोहित शर्मापेक्षा जास्त द्विशतक मारेल. विराट कोहलीपेक्षा जास्त शतक झळकवेल; पण कुठल्या भारतीय कर्णधाराला धोनीसारखे आयसीसीची तीन विजेतेपद मिळवून देणे जमेल असे वाटत नाही,’ असे गौतम गंभीर याने म्हटले आहे. टी-२०  वर्ल्ड कप २०२२  मध्ये… Continue reading धोनीसारखे तीन विजेतेपद मिळवून देणे अशक्य : गौतम गंभीर

भारताचा लाजीरवाणा पराभव, इंग्लंड अंतिम फेरीत

अ‍ॅडलेड (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. इंग्लंड संघाने भारताचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत इंग्लंडने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. एलेक्‍स हेल्‍स आणि जोस बटलर या सलामी जोडीने सर्वभार स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. इंग्लंड आता थेट रविवारी होणाऱ्या अंतिम… Continue reading भारताचा लाजीरवाणा पराभव, इंग्लंड अंतिम फेरीत

राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथे सुरू असलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने पदकांवर ३ मोहर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा, जालनाव अन्य जिल्ह्यांतून ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके मिळाली. दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६७ गुण मिळवत पात्रता… Continue reading राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके

भारताचा इंग्लंडवर वरचष्मा राहणार, गुरुवारी दुसरा उपांत्य सामना

अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होत आहे. सध्या भारताची बाजू भक्कम असून, या सामन्यात इंग्लंडला धूळ चारून भारत अंतिम फेरीत धडक मारेल, अशी तमाम क्रिकेट शौकिनांची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड ओव्हल येथे हा सामना होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना खेळवला जाईल. सामना सुरु… Continue reading भारताचा इंग्लंडवर वरचष्मा राहणार, गुरुवारी दुसरा उपांत्य सामना

पाकिस्तान अंतिम फेरीत, न्यूझीलंडवर दणदणीत विजय

सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण… Continue reading पाकिस्तान अंतिम फेरीत, न्यूझीलंडवर दणदणीत विजय

तीन कारणांमुळे भारतीय संघाचे वाढलेय टेन्शन

अॅडलेड (वृत्तसंस्था) : भारताचा उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडसोबत होणार आहे. भारत सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे, पण भारताचे तीन गोष्टींमुळे दडपण वाढले आहे. रोहित शर्माला झालेली दुखापत, भारताची आतापर्यंत डळमळीत सुरुवात आणि फिरकी गोलंदाजांचे अपयश या तीन कारणांमुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्यामुळे रोहित… Continue reading तीन कारणांमुळे भारतीय संघाचे वाढलेय टेन्शन

कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर

मेलबर्न (वृत्तसंस्था) : सध्या सुरु असलेल्या टी- २० वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर पडली आहे. सामन्यापूर्वी सराव सुरु असतानाच नेट्समध्ये बॅटिंग करत असताना रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीकडे पाहता, संघावर मोठे दडपण आले असून, तो संघातून बाहेर पडल्यास… Continue reading कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे चिंतेत भर

error: Content is protected !!