उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येथे ५५ वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांंनी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे.

यावेळी नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर, तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खो-खो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.