राशिवडे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय क्रीडा विभागाच्या वतीने तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये विविध वयोगटांमध्ये नागेश्वर हायस्कूलच्या ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यामध्ये चौदा वर्षाखालील मुलामुलींच्याच गटामध्ये शुभम लाड, सुदर्शन पाटील, शर्वरी कांबळे, प्राजक्ता पाटील, सिद्धी पाटील, धनिष्ठा पाटील यांनी यश मिळवले. तर सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या गटामध्ये सुरज बिल्ले, संकल्प आजमने, सिद्धी आजमने, सिद्धी चौगुले, राही पाटील यांनी यश संपादन केले.

या विजेत्या सर्व खेळाडूंची नृसिंहवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांना मारुती सुतार, सुनील ढोकरे, क्रीडा शिक्षक संभाजी चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.