कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील एस. के. पाटील महाविद्यालयात झालेल्या कोल्हापूर झोनल व्हॉलीबॉल स्पर्धेत एस. के. पाटील महाविद्यालय संघाने प्रथम क्रमांक मिळविला व अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळ करत बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आंतर विभागीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून कुरुंदवाडच्या व्हॉलीबॉलच्या खेळाची परंपरा कायम ठेवली.

या संघामधून शिवाजी विद्यापीठाचा व्हॉलीबॉलचा संघ निवडला जाणार आहे व तो संघ औरंगाबाद येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सवांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या एस. के. पाटील महाविद्यालयाच्या संघाला डॉ. सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन, तर संस्थेचे चेअरमन जयराम बापू पाटील व व प्राचार्य डॉ. वाय. एम. चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले यामध्ये श्री स्पोर्ट क्लब कुरुंदवाडच्या सर्व खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे.