रोहित-विराट कोहली यांची उचलबांगडी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसह विश्वचषक २०२४ ची सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या टी-२० संघाचा भाग नसल्याचे सांगण्यात येत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे.  नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर त्याच्याकडे औपचारिकपणे टी-२० कर्णधारपद सोपवण्यात… Continue reading रोहित-विराट कोहली यांची उचलबांगडी

घानाचा दक्षिण कोरियावर ३-२ ने विजय

कतार : फिफा विश्वचषकात घाना आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्यात घानाने दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला. मात्र, दक्षिण कोरियाविरुद्धच्या विजयानंतर घानाने राउंड ऑफ-१६ मध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाविरुद्ध घानाच्या विजयाकडे एक उलटफेरा म्हणून पाहिले जात आहे. कारण फिफा रँकिंगवर नजर टाकली, तर दक्षिण कोरियाचे फिफा रँकिंग २८ आहे, तर… Continue reading घानाचा दक्षिण कोरियावर ३-२ ने विजय

संजीवनच्या सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ संघात निवड

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पन्हाळा सोमवार पेठ येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सहा विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या अश्वमेघ क्रीडा महोत्सव २०२२ या स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाच्या संघातून निवड झाली आहे. ह्या  स्पर्धा ह्या ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२२ या दरम्यान औरंगाबाद  विद्यापीठ, औरंगाबाद येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व… Continue reading संजीवनच्या सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ संघात निवड

‘आयओए’च्या अध्यक्षपदी पी. टी. उषा यांची निवड निश्चित

दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची महान धावपटू आणि माजी ऑलिम्पिक खेळाडू पी. टी. उषा यांनी ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) ९५ वर्षांच्या इतिहासात पी. टी. उषा या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होणार आहेत. याशिवाय उषा आयओए प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असतील. उषा सध्या राज्यसभेच्या खासदारही आहेत. उषा… Continue reading ‘आयओए’च्या अध्यक्षपदी पी. टी. उषा यांची निवड निश्चित

ऋतुराज गायकवाडचे एकाच षटकात सात षटकार

मुंबई (प्रतिनिधी):  महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. ऋतुराजने या षटकातील चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले, त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय. ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये… Continue reading ऋतुराज गायकवाडचे एकाच षटकात सात षटकार

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत हेरवाडच्या भूमिका मोहितेला सुवर्ण पदक…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जळगांव येथे महाराष्ट्र स्टेट वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हेरवाडची भूमिका मोहितेने सुवर्णपदक पटकावून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्यामुळे हेरवाडचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. भूमिकाने   सुवर्णपदक पटकावून यश संपादन केल्यामुळे हेरवाडसह परिसरात तिचे कौतुक होत आहे. भूमिकाने… Continue reading राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत हेरवाडच्या भूमिका मोहितेला सुवर्ण पदक…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आज पोलीस परेड ग्राउंड येथे घेण्यात आल्या. याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे तसेच झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नरेंद्र झवर, रोटरी होरायझनचे सर्व पदाधिकारी या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित… Continue reading दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न…

यजमान कतार विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

कतार : फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत यजमान कतारला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कतार आणि सेनेगल यांच्यामधील सामन्यात कतारला पराभव पत्करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यातही यजमान कतारचा इक्वेडोरने पराभव केला होता. त्यानंतर आता सेनेगल विरुद्धचा सामनाही कतारला जिंकता आलेला नाही. सेनेगलने कतारला ३-१ ने हरवले. दोहा येथील अल थुमामा स्टेडियममध्ये हा सामना पार… Continue reading यजमान कतार विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

मुरगूडमध्ये कुस्ती स्पर्धेेत ४९० मल्लांंचा सहभाग

मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्यावतीने गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह वि. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय मॅटवरील ‘लाल आखाडा चषक’ भव्य कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटात ४९० मल्लांंनी सहभाग घेतला. यामध्ये खुल्या गटात राजभरातून ५५ मल्ल सहभागी झाले असूून, लाल… Continue reading मुरगूडमध्ये कुस्ती स्पर्धेेत ४९० मल्लांंचा सहभाग

कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम ४ डिसेंबरपासून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील फुटबॉल स्पर्धेचा हंगाम येत्या चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमुळे कोल्हापूर फुटबॉलमय झाल्याने स्थानिक खेळाडू आणि शौकिनांचा जोश वाढला आहे. शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी १६ संघ मैदानात उतरणार आहेत. सीनियर सुपर ८ व सुपर… Continue reading कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम ४ डिसेंबरपासून

error: Content is protected !!