कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक फुटबाल स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याच्या अर्जेंटिना संघाला दुबळ्या सौदी अरेबिया संघाकडून २-१ च्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी सर्वात मोठी उलटफेर झाला. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ‘क’ गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला. १० व्या मिनिटाला कर्णधार मेस्सीने आघाडी घेतल्यानंतरही संघाला सामना जिंकता आला नाही. सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने 48व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने 53व्या मिनिटाला गोल केला.

विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर कमाल फॉर्म दाखवत खेळ केला होता. त्यांनी मागील ३६ सामन्यांपासून पराभव पाहिला नव्हता. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्याला सलामीचा सामना गमवावा लागला आहे. सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सीने (१० वे मिनिट) पेनल्टीच्या मदतीणे एक गोल केला, तर सौदीकडून सालेह अल्सेरीने (४८ वे मिनिट) आणि सालेम अल्डवेसरीने (५३ वे मिनिट) गोलं केले.

सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फॉर्म पाहता ते सहज सामना जिंकतील असे वाटत होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. मेस्सीने १० व्या मिनिटांना पेनल्टीच्या मदतीने गोल करत खाते उघडले. त्यानंतर दोन्ही संघ अटीतटीचा खेळ करत होते. हाफ टाईमपर्यंत १-० च्या स्कोरने अर्जेंटिना आघाडीवर होता.

हाफ टाईमनंतर सौदीने आपला खेळ कमालीचा सुधारत ४८ व्या मिनिटाला गोल केला. सालेह अल्सेरीनं हा गोल करत सामन्यात बरोबरी साधली. काही वेळातच ५३ व्या मिनिटाला सालेम अल्डवेसरीने गोल करत सौदीची आघाडी २-१ अशी केली. ज्यानंतर अर्जेंटिना संघाने बरेच प्रयत्न केले. पण सौदीच्या दमदार डिफेन्समुळे तर कधी ऑफसाईडमुळे त्यांना गोल करता आला नाही. ज्यानंतर अखेर सामना संपताना २-१ अशा स्कोरने सौदीने सामना जिंकला.