भारताबरोबरच्या पुढील सामन्यात पाकिस्तानच जिंकेल : शोएब अख्तर

मेलबर्न : भारताकडून झालेला हा पराभव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पचवता आलेला नाही. त्याने थेट भारताला आव्हान दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा सामना होईल. त्या सामन्यामध्ये पाकिस्तान भारतावर हमखास विजय मिळवेल, असे शोएब अख्तर म्हणाला. पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत शोएब अख्तरने भारताने आपला विजय वाया घालवू… Continue reading भारताबरोबरच्या पुढील सामन्यात पाकिस्तानच जिंकेल : शोएब अख्तर

भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी हायहोल्टेज सामना

मेलबर्न : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ही लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. गेल्या वर्षी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती आणि तेव्हा भारताचा १० गडी राखून पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित आणि कंपनी मैदानात उतरले. दिवाळीच्या आदल्या दिवशी या दोन पारंपरिक… Continue reading भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी हायहोल्टेज सामना

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही देशांमधील सामना होणार आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या अहवालानुसार २१ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियन महानगरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची ६५ टक्के शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा… Continue reading भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

शेवटच्या षटकात शमीचे ४ बळी, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

ब्रिस्बेन: भारतीय क्रिकेट संघाचे ‘मिशन टी-२० विश्वचषक’ आज खर्‍या अर्थाने सुरू झाले असून, टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम… Continue reading शेवटच्या षटकात शमीचे ४ बळी, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा

अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली आहे. कतारमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक-२०२२ नंतर तो फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. मेस्सीने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान निवृत्तीबाबतची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय फुटबॉलपटू मेस्सीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकानंतर मी या खेळातून निवृत्ती घेईन. मी आधीच निर्णय घेतला आहे… Continue reading अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा

थायलंडमध्ये गोळीबार २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू

बँकॉक: थायलंडमध्ये एका प्री-स्कूलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त असून त्यात २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने प्री-स्कूल चाइल्ड डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार केला. थायलंडच्या उत्तर पूर्व भागातील बुआ लाम्फू येथे झालेल्या या घटनेनंतर गोळीबार करणारा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्यामध्ये मुलांचा आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गोळीबार करणाऱ्याने चाकूने… Continue reading थायलंडमध्ये गोळीबार २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू

एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला रौप्यपदक

पन्हाळा (प्रतिनिधी) : बेहरानमधील रोही येथे झालेल्या २१ व्या एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये २० वर्षांखालील मुलांच्या संघाने रौप्यपदक मिळवले. २० वर्षांनंतर हे यश मिळवल्याने भारतीय संघ २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. देशात आगमन झालेल्या व्हॉलीबॉल संघाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिल्लीमध्ये अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अशी माहिती महासंघाचे सहसचिव व… Continue reading एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला रौप्यपदक

माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

मास्को (वृत्तसंस्था) : शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून मिखाईल गोर्बाचेव्ह हे आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गोर्बाचेव्ह हे १९८५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले होते. तसेच १९९१ पर्यंत ते या पक्षाचे सरचिटणीस होते. त्यानंतर… Continue reading माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

राष्ट्रकुल स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी

लंडन (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत पहिले सुवर्णपदक जिंकले. पी. व्ही. सिंधू हिने एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या मिशेल लीचा सलग दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरती असलेल्या पी.व्ही. सिंधूने पहिला गेम २१-१५ असा… Continue reading राष्ट्रकुल स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी

अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन.

लखनऊ (वृत्तसंस्था): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल लखनऊ येथे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.  मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते. तुम्ही माझ्यावर… Continue reading अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन.

error: Content is protected !!