विश्वचषक स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२०विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. यंदाच्या विश्वचषकमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करण्यात आला असून, त्यानुसार विश्वचषकच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा निकाल… Continue reading विश्वचषक स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नवे नियम

झिम्बाब्वेविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकावाच लागणार

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमधील भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध रंगणार आहे. प्रत्येक संघाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जणार हे निश्चित नाही, अशी ग्रुप टूची स्थिती असताना भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. उपांत्यफेरीमध्ये आप स्थान निश्चित करण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननेच गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला मोठ्या… Continue reading झिम्बाब्वेविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकावाच लागणार

इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पायाला लागली गोळी

वजिराबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लॉन्ग मार्चमध्ये गुरुवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेत इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा’चे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे ४… Continue reading इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पायाला लागली गोळी

रंगतदार सामन्यात भारताचा निसटता विजय

अ‌ॅडलेड : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. पावसाने रोमांचक झालेल्या या सामन्यात प्रत्युत्तरात बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार १६ षटकांत ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. या विजयामुळे उपांत्य फेरीतील भारताचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. भारताने या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी १८५… Continue reading रंगतदार सामन्यात भारताचा निसटता विजय

भारताचा बुधवारी बांग्लादेशविरुद्ध महत्त्वाचा सामना

पर्थ (वृत्तसंस्था) : भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आता बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडच्या मैदानावर बुधवार, दि. २ नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या सुपर १२ मधील लढती आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. उपांत्य फेरीचे चित्र कसे असेल हे स्पष्ट होत असून, ग्रुप २ मधून उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाची… Continue reading भारताचा बुधवारी बांग्लादेशविरुद्ध महत्त्वाचा सामना

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाची शक्यता?

पर्थ (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा तिसरा सामना रविवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यालाही हवामानाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र क्रिकेट चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे सामन्यात पाऊस पडला नाही. आता पर्थमध्ये… Continue reading भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाची शक्यता?

नेट रन रेटवर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार

सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यामुळे आता पाकिस्तानचे उपांत्यफेरीतील स्वप्न धुसर झाले आहे. मात्र नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तानला अजूनही या स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. आपले उर्वरित सर्व सामने जिंकणे, भारताने त्यांचे सर्व सामने जिंकणे, दक्षिण आफ्रिकेचा आणि झिम्बाब्वेचा त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी किमान दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यास पाकिस्तानला… Continue reading नेट रन रेटवर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार

भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय

सिडनी : भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताला अखेरच्या षटकावर पाकिस्तानवर विजय मिळवता आला होता. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १२३ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि अश्विनने २-२ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमीने एक… Continue reading भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय

तीन चुका करूनही रोहितने झळकवले अर्धशतक

सिडनी : नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माकडून तब्बल तीन चुका घडल्याचे पाहावयास मिळाले. पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितला मोठी खेळी साकारता आली नव्हती. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा याने तीन चुका करूनही अर्धशतक झळकवले. नेदरलँड्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून पहिली चूक घडली ती पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर. रोहितने या चेंडूवर पुलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.… Continue reading तीन चुका करूनही रोहितने झळकवले अर्धशतक

भारताचे नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य

सिडनी : टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या सुरेख खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराटने ४४  चेंडूत ६२, सूर्याने २५ चेंडूत ५१ आणि रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी… Continue reading भारताचे नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य

error: Content is protected !!