ब्रिस्बेन: भारतीय क्रिकेट संघाचे ‘मिशन टी-२० विश्वचषक’ आज खर्‍या अर्थाने सुरू झाले असून, टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम डेव्हिडचा अप्रतिम असा झेल पकडला आणि त्याआधी एक अ‍ॅश्टन अ‍ॅगरला धावबाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकताच भारताला फलंदाजीस्तही पाचारण केल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी उत्तम खेळी दाखवली आणि मोही धावसंख्या उभारली. दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी पार पाडली. ब्रेकनंतर संघात आलेल्या मोहम्मद शमीने त्याच्या सोपवलेली कामगिरी फत्ते केली. टीम इंडियाने अखेरच्या षटकात चार विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि हा रोमांचक सामना ६ धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला १८० धावा करता आल्या.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावांची गरज होती, पण भारताने अशी खेळी दाखवली की सगळेच अवाक झाले. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात एकूण चार गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला जिंकणे कठीण झाले. बुमराहच्या अनुपस्थितीत शमीने त्याच्यासारखे यॉर्कर टाकत आश्चर्यकारक कामगिरी केली

ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात कर्णधार ॲरॉन फिंचने ७६ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार खेचले. फिंचशिवाय मिचेल मार्शने ३५, ग्लेन मॅक्सवेलने २३ धावा केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने २, अर्शदीप-हर्षल आणि चहलला १-१ विकेट मिळाली, तर मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये ३ विकेट घेतल्या. पहिल्या डावात भारतीय संघाच्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यांनी अनुक्रमे ५७ आणि ५० धावा केल्या.