कुरुंदडवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दर्शन रांगेतच दोन भाविकांच्या तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक भाविक रक्तबंबाळ झाला होता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर औषधउपचार करण्यात आले. संबधीत जखमी भाविक कर्नाटकमधील असून त्या भाविकांने शिरोळ पोलीस स्टेशन येथे मारहाणी बाबत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.


दरम्यान या घटनेमुळे मंदिर परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरात सर्वत्र सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदरची घटना कैद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मारहाण करणारे कोण आहेत याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.