मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्म ठेपाची शिक्षा सुनावली होती. पण प्रदीप शर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली .आता मुंबई उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या या आदेशाला पुढील निर्देश देईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा प्रदीप शर्मांवर आरोप

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ ला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास एनआयएने हाती घेतला होता. दरम्यान, या गाडीचे मालक यांचा मृतदेह समुद्रात सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या हत्ये प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मांवर करण्यात आला आहे.

सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित

दरम्यान, या प्रकरणी आता सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी चार आठवड्यानंतर होईल. तोपर्यंत राज्य सरकारला या संदर्भातील उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे मांडावं लागेल. मात्र, तुर्तास प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा आणि शरण येण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.