शिंगणापूर (प्रतिनिधी) : टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा सामना बघत असताना, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले आणि बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन जोरदार हाणामारी झाली होती. ही घटना बुधवार (दि. 27) रोजी हणमंतवाडी (ता.करवीर) येथे घडली होती.

या घटनेत बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या चुलत्या-पुतण्यांनी लाकडी फळी आणि काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबिले यांना मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्याीवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना काल त्यांचा मृत्यू झाला. संशयित सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.