दूध उत्पादकाला चांगलं माहीत आहे गोकुळ कसा चाललाय ! : अरुण नरके (व्हिडिओ)

कोण काय म्हणतंय याला महत्त्व नाही, गोकुळच्या दूध उत्पादकाला चांगलं माहीत आहे गोकुळ कसा चाललाय, असे प्रत्युत्तर गोकुळचे ज्येष्ठ नेते अरुण नरके यांनी दिले.  

विरोधकांना जाहीर चौकात प्रत्युत्तर देणार : महादेवराव महाडिक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विरोधक नेहमी आमच्या पाचवीला पुजलेले आहेत‌. गोकुळ संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीच्या विरोधात विरोधकांची अभद्र युती झालेली आहे. त्यांच्या आरोपांची मी साधी दखलही घेत नाही‌. यावर मी सर्वांचा बाप असून योग्य वेळी जाहीर चौकात त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिला. ते गडहिंग्लज येथे आयोजित राजर्षी… Continue reading विरोधकांना जाहीर चौकात प्रत्युत्तर देणार : महादेवराव महाडिक

इचलकरंजीतील सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुकारण्यात आली आहे. कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. हे ओळखून इचलकरंजीतील ‘व्हिजन इचलकरंजी’ या सामाजिक संस्थेने गरजूंना अन्नदान करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे १२५ नागरिकांना याचा लाभ होत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमाची… Continue reading इचलकरंजीतील सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम…

अजून महादेवराव महाडिक सहीसलामत आहे ! : ‘आप्पां’चे विरोधकांना आव्हान (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघाच्या प्रचारसभेत अखेर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तोफ धडाडली असून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.  

कळंबा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कंळबा कारागृहात खंडणी, विनयभंग,दरोडा,आत्महत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्याप्रकरणी जेरबंद असलेल्या एका कैद्याने आपल्या भावावर अँट्रासिटी दाखल झाल्याच्या कारणावरून काल (गुरुवार) रात्री जेलमध्ये शुगर,रक्तदाबाच्या गोळ्या तसेच डेटॉल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अतुल बाबुराव पवार (रा. वडूज,ता. खटाव,जि. सातारा) असे त्या… Continue reading कळंबा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न…

धोत्री गल्लीतील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा स्टँड परिसरातील धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेने आज (शुक्रवार) चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी महापालिका प्रशासकांना रात्रीच्या सुमारास  आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा साठा शिल्लक असताना ते संपले असल्याचा फोन केला. याबाबत… Continue reading धोत्री गल्लीतील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस…

श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. देवाचा पालखी सोहळा २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मात्र या मानकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. विनय कोरे आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी लाखो भक्तांच्या… Continue reading श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

‘त्या’साठीच आम्ही गोकुळ मल्टीस्टेटकरणाच्या विरोधात लढा दिला : ना. सतेज पाटील

पन्हाळा (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा यासाठी मल्टीस्टेटच्या विरोधात आम्ही लढा दिला.  आपल्या मताचा स्वाभिमान जागृत ठेवला, याची जाणीव ठेवूनच मतदारांनी मतदान करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते आज (शनिवार) पन्हाळा येथे नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात राजर्षी शाहू आघाडीच्यावतीने आयोजित गोकुळ ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी आ. डॉ.… Continue reading ‘त्या’साठीच आम्ही गोकुळ मल्टीस्टेटकरणाच्या विरोधात लढा दिला : ना. सतेज पाटील

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महालक्ष्मी चेंबर्समधील दोन दुकाने सील…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये असणाऱ्या समीर कम्युनिकेशन आणि योगेश टेलिकॉम ही दोन दुकाने सकाळी ११ नंतर सुरु ठेवल्याने त्यांच्यावर आज (शुक्रवार) महापालिकेने कारवाई करत ती दुकाने सीलबंद करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. शहरामध्ये या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथकांची… Continue reading नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महालक्ष्मी चेंबर्समधील दोन दुकाने सील…

‘रेमडीसीवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्या : राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत आहे. यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तातडीची बैठक घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केल्या.… Continue reading ‘रेमडीसीवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्या : राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना  

error: Content is protected !!