कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये असणाऱ्या समीर कम्युनिकेशन आणि योगेश टेलिकॉम ही दोन दुकाने सकाळी ११ नंतर सुरु ठेवल्याने त्यांच्यावर आज (शुक्रवार) महापालिकेने कारवाई करत ती दुकाने सीलबंद करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत.

शहरामध्ये या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे पथक अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सुरु असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. पहिल्यांदा सुचना देऊनही पुन्हा दुकान उघडे असलेचे आढळल्यास ही दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर आणि कर्मचाऱ्यांनी केली.