इचलकरंजी (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुकारण्यात आली आहे. कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. हे ओळखून इचलकरंजीतील ‘व्हिजन इचलकरंजी’ या सामाजिक संस्थेने गरजूंना अन्नदान करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे १२५ नागरिकांना याचा लाभ होत आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात २३ एप्रिलपासून करण्यात आली आहे. शहरातील गरजू, ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा व्यक्तींसाठी संस्थेने हा उपक्रम सुरू केला. रोज दुपारी बाराच्या सुमारास अन्नवाटप करण्यात येते. हा उपक्रम दोन मे पर्यंत असाच अखंडित सुरू राहणार आहेत. दररोज सुमारे १२५  नागरिक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत. जर कडक लॉकडाउन अनेक दिवस राहिला तर तर हा उपक्रम असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

हा उपक्रम राबवत असताना संस्थेस देणगीसाठी देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घ्यावा असे आवाहनदेखील या संस्थेच्या वतीने करण्यात आले.