कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कंळबा कारागृहात खंडणी, विनयभंग,दरोडा,आत्महत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्याप्रकरणी जेरबंद असलेल्या एका कैद्याने आपल्या भावावर अँट्रासिटी दाखल झाल्याच्या कारणावरून काल (गुरुवार) रात्री जेलमध्ये शुगर,रक्तदाबाच्या गोळ्या तसेच डेटॉल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

याबाबत त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अतुल बाबुराव पवार (रा. वडूज,ता. खटाव,जि. सातारा) असे त्या कैद्याचे नाव आहे. तर त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून सध्या कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूलकर यांनी दिली.