भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने जागतिक पुस्तक दिवस संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जरगनगर येथे भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आज (शुक्रवार) जागतिक पुस्तक दिवस संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदीर, नेहरुनगर विद्यामंदीर या शाळांना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं… Continue reading भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने जागतिक पुस्तक दिवस संपन्न…

सीपीआरमधील कोरोना लसीकरण विभाग तळ मजल्यावर सुरु करावा : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेला कोरोना लसीकरण विभाग तळ मजल्यावर सुरू करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास प्राधान्य देण्यात यावे आणि कोरोना टेस्टची वेळ दुपारी २ ऐवजी ती वाढवून रात्री ९ पर्यंत करण्यात यावी. अशा मागण्या आज (शुक्रवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या. याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शिष्टमंडळासमवेत सीपीआर… Continue reading सीपीआरमधील कोरोना लसीकरण विभाग तळ मजल्यावर सुरु करावा : शिवसेनेची मागणी

जाणून घ्या, ‘ई-पास’ काढण्याची प्रक्रिया…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी अंत्यविधी, निकटच्या व्यक्तीचा विवाह आणि वैद्यकीय आणीबाणी ही प्रमुख तीन कारणे सोडून इतर कारणास्तव इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर जाण्यास सर्वसामान्यांना बंदी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा… Continue reading जाणून घ्या, ‘ई-पास’ काढण्याची प्रक्रिया…

इचलकरंजी नगरपालिकेला निर्जंतुकीकरण ट्रॅक्टर प्रदान…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर खा. धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून इचलकरंजी नगरपरिषदेला शहर आणि परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी चार ट्रॅक्टर प्रदान करण्यात आले. आज (शुक्रवार) याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यामुळे इचलकरंजी शहर आणि परिसरात निर्जंतुकरण करण्यास मदत होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी,उपनगराध्यक्ष तानाजी पवार, उदयसिंग पाटील,… Continue reading इचलकरंजी नगरपालिकेला निर्जंतुकीकरण ट्रॅक्टर प्रदान…

‘जीएसटी’चे १३ कोटी न आल्याने कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या तिजोरीत अक्षरशः खडखडाट झाला आहे. महिना संपत आला तरी अजूनही निवृत्ती वेतन देता आलेले नाही. रोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीएसटीचे १३ कोटी शासनाकडून न मिळाल्याने महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रकातील आकडे खूप मोठे आहेत. पण, दैनंदिन खर्चही भागवणे प्रशासनाला कठीण झाले आहे. सुमारे… Continue reading ‘जीएसटी’चे १३ कोटी न आल्याने कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट…

गोकुळच्या निवडणुकीसाठी राज्यकर्तेच कोरोनाचे नियम मोडत आहेत : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीसाठी राज्यकर्ते कोरोनाचा नियम पाळत नसतील तर जनतेला कोणत्या तोंडाने नियम पाळायला सांगणार. असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी करतानाच कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी आणि… Continue reading गोकुळच्या निवडणुकीसाठी राज्यकर्तेच कोरोनाचे नियम मोडत आहेत : राजू शेट्टी

जयसिंगपूरमधील रुग्णालयात संपला अचानक ऑक्सिजन आणि..! : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिरोळ-जयसिंगपूर परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. नुकत्याच एका गोकुळच्या एका ठरावधारक मतदाराचा मृत्यू झाला. याच दरम्यान, जयसिंगपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. यामध्ये ४० रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. माजी खा. राजू शेट्टी यांनी हालचाल केल्यानंतर संबंधित रुग्णालयाला ऑक्सिजनची सोय करून देण्यात आली. ही माहिती स्वतः राजू शेट्टी यांनीच… Continue reading जयसिंगपूरमधील रुग्णालयात संपला अचानक ऑक्सिजन आणि..! : राजू शेट्टी

सीबीएस जवळ अँन्टीजन टेस्ट मोहिमेत ६ ‘पॉझिटीव्ह’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फिरणाऱ्याचे गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज (शुक्रवार) महापालिकेच्या मोबाईल व्हँनद्वारे सुरू असलेल्या नागरिकांची अँन्टीजन टेस्ट मोहिमेत एका मिठाईवाल्यासह बाहेरील ५ प्रवासी अशा ६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यावेळी ४६ नागरिकांची अँन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये… Continue reading सीबीएस जवळ अँन्टीजन टेस्ट मोहिमेत ६ ‘पॉझिटीव्ह’

कोल्हापूर कोरोना अपडेट : ८२१ जणांना लागण तर २६ जणांचा बळी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून २६ जणांचा बळी गेला आहे. तर आज (गुरुवार) दिवसभरात २८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३,८०४ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २९२, आजरा तालुक्यातील ४, भुदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १८, गडहिंग्लज तालुक्यातील २७, हातकणंगले तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : ८२१ जणांना लागण तर २६ जणांचा बळी…

म्हासुर्ली येथे दोन गटात तुंबळ हाणामारी ; पाच जखमी…

कळे (प्रतिनिधी) : म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी (ता. राधानगरी) येथे एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन दोन्ही बाजूचे पाचजण जखमी झाले आहेत. राधानगरी पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी कुंभारवाडी येथे रस्त्याने जाताना एकमेकांकडे रागाने बघण्यावरून सदर दोन्ही गटात किरकोळ वाद झाला होता. मात्र जाणकारांनी मध्यस्थी करत भांडण काल रात्रीच मिटविले.… Continue reading म्हासुर्ली येथे दोन गटात तुंबळ हाणामारी ; पाच जखमी…

error: Content is protected !!