संपूर्ण पॅनेल पाडून या ‘चोरांना’ धडा शिकवा : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांचे संपूर्ण पॅनेल पाडून या ‘चोरांना’ धडा शिकवा, असे आवाहन ना. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील मेळाव्यात केले.  

कसबा बावडा येथे इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा परिसरातील एका इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सविता रवींद्र मोहिते असे त्यांचे नाव असून हा प्रकार आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास घडला. शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद झालीय. बँक कर्मचारी असलेले रवींद्र मोहिते हे कसबा बावडा – कदमवाडी रोडवरील ‘वसंत निवारा’ या इमारतीत चौथ्या… Continue reading कसबा बावडा येथे इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू…

महाडिकांना संपविण्याची भाषा सोडून द्या : धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजपर्यंत ५ निवडणुका लढलो आहे. त्यापैकी एकच जिंकलो आहे. त्यामुळे चारवेळा हरलो म्हणजे मी काही संपलो नाही. जिंकणे, हरणे हा लढाईचा भाग आहे. परंतु काहीजण महाडिकमुक्त जिल्हा करण्याची भाषा करत आहेत. लढाई करायची असेल तर तत्वांची करा, महाडिकांना संपविण्याची भाषा सोडून द्या, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील… Continue reading महाडिकांना संपविण्याची भाषा सोडून द्या : धनंजय महाडिक

बाजार भोगाव येथे बेकायदा दारूविक्री करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

कळे  (प्रतिनिधी ) :  बाजार भोगाव ( ता.पन्हाळा ) परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ३०  हजार ९९२  रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई कळे पोलिसांनी केली. बाजार भोगाव ते पडसाळी रस्त्यावरील काऊरवाडी गावच्या हद्दीत असलेल्या पृथ्वीराज बिअर शॉपीलगत ही कारवाई केली. याठिकाणी कोलिक पैकी चाफेवाडी (ता.पन्हाळा)… Continue reading बाजार भोगाव येथे बेकायदा दारूविक्री करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

विश्वासघात झाल्याने आम्ही विरोधक झालो : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिले होते. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला पाटील यांनी  आज (रविवार) भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिले आहे.  यावर बोलताना पाटील म्हणाले की,  आम्हाला… Continue reading विश्वासघात झाल्याने आम्ही विरोधक झालो : चंद्रकांत पाटील

देवकेवाडी येथील दारू अड्ड्यावर भुदरगड पोलिसांचा छापा : सात लाखांचा मुद्देमाल जप्त

गारगोटी (प्रतिनिधी) : जंगल परिसरातील देवकेवाडी (ता. भुदरगड) येथे गावठी दारू अड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी आज (रविवार) दुपारी धाड टाकली. या धाडीत दारू बनवणारे रसायन, प्लास्टिक टाक्या, मोटारसायकली असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी नांदोली व शेळोली येथे ४० हजारांची गोवा बनावटीची दारू पकडल्यानंतर भुदरगड पोलिसांनी गावठी दारू… Continue reading देवकेवाडी येथील दारू अड्ड्यावर भुदरगड पोलिसांचा छापा : सात लाखांचा मुद्देमाल जप्त

नियम उल्लंघन करणाऱ्यांना शिरोली पोलिसांचा हिसका : एक लाखावर दंड वसूल, ४६ वाहने जप्त

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली असुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लोकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिरोली एम.आय.डी सी पोलीस ठाण्याने बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या ठाण्याअंतर्गत शिरोली पुलाची, नागाव, मौजे वडगाव, टोप, कासारवाडी फाटा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काल रात्री विनामास्क फिरणाऱ्या ६६ नागरिकांना दंड केला… Continue reading नियम उल्लंघन करणाऱ्यांना शिरोली पोलिसांचा हिसका : एक लाखावर दंड वसूल, ४६ वाहने जप्त

सर्वांचे मोफत लसीकरण : ठाकरे सरकारची घोषणा   

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून राज्य सरकारने कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून राज्यभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब… Continue reading सर्वांचे मोफत लसीकरण : ठाकरे सरकारची घोषणा   

आळते येथे महावीर जयंती साधेपणाने..!

हातकणंगले (प्रतिनिधी)  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे नियमांचे पालन करत भक्तीमय वातावरणात भगवान महावीर जयंती  आज (रविवार) साधेपणाने साजरी करण्यात आली.  महावीरांच्या प्रतिमेचे  पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांनी आरती करून सुंठवडयाचे वाटप केले. यावेळी बाळासाहेब पाटील, गणेश खटावकर यांनी भगवान महावीरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. अभिषेक पाटील, निखिल खटावकर,  शितल… Continue reading आळते येथे महावीर जयंती साधेपणाने..!

‘माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु’, या गाण्याचे गीतकार काळाच्या पडद्याआड

नवी मुंबई (प्रतिनिधी)  :  ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीत सक्रीय असणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने  आज (रविवार) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांना पक्षाघात  झाला होता. मागील काही वर्षांपासून ते आजारी असल्याने अंथरुणावरच होते. अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.    तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता,  आता तरी देवा मला पावशील का,  माझ्या… Continue reading ‘माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु’, या गाण्याचे गीतकार काळाच्या पडद्याआड

error: Content is protected !!