कळे परिसरातील दुकानदारांवर मोठी कारवाई   

कळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशाचे उल्लंघन करत दुकाने सुरू ठेवणाऱ्या तिघा दुकानदारांवर कळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा केली. कळे- बाजार भोगाव मार्गावरील काटेभोगाव बाजारपेठेत जोतिर्लिंग बझार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बझारचे मालक बाळासाहेब श्रीपती पाटील (वय २६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संदीप शिवाजी पाटील… Continue reading कळे परिसरातील दुकानदारांवर मोठी कारवाई   

कोरोनामुक्त टोपसाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे : प्रदिप पाटील

टोप (प्रतिनिधी) : सरपंच, उपसरपंच, तलाठी आणि दक्षता समिती या सर्वांनी एकत्र येऊन टोप गाव १०० टक्के कोरोनामुक्त करुन तालुक्यात एक आदर्श निर्माण करुया, असे आवाहन पंचायत समिती सभापती प्रदिप पाटील यांनी टोप येथे दक्षता समितीच्या बैठकीत केले.   ते म्हणाले की, गावाजवळ शिरोली एमआयडीसी आहे. त्यामुळे हजारो लोकांची येथे वर्दळ असते. त्यामुळे गावात एकही रुग्ण… Continue reading कोरोनामुक्त टोपसाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे : प्रदिप पाटील

‘गोकुळ’ची सुनावणी झालीच नाही : निवडणुकीचा मार्ग मोकळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला कोरोनामुळे स्थगिती देण्याबाबत सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (सोमवार) होणारी सुनावणी झालीच नाही. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे. तर पुढील सुनावणीची तारीख अनिश्चित असल्याने निवडणूक नियोजित वेळेनुसारच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी गटाने सुस्कारा सोडला आहे. तर सत्तारूढ… Continue reading ‘गोकुळ’ची सुनावणी झालीच नाही : निवडणुकीचा मार्ग मोकळा

गगनबावड्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

बोरपाडळे (प्रतिनिधी) :  गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे  नियोजन केल्यामुळेच  कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यास मदत झाली  आहे.  परंतु  सध्याचा कोविड विषाणू वेगाने पसरत आहे.  त्यामुळे कठोर उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. ना. पाटील यांनी नुकताच गगनबावडा तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गगनबावडा… Continue reading गगनबावड्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

श्री जोतिबाचे घरातूनच घ्या लाईव्ह दर्शन..!  

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा यात्रेवर सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचे सावट पडले आहे.  मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज (सोमवार)  पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजाअर्चा केली जाणार आहे. श्री जोतिबाच्या महापूजेच्या लाईव्ह दर्शनाची सोय फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, आणि घरातूनच घ्या जोतिबाचे लाईव्ह दर्शन, असे आवाहन… Continue reading श्री जोतिबाचे घरातूनच घ्या लाईव्ह दर्शन..!  

‘त्या’मुळेच पालकमंत्र्यांना ‘महाडिकांवर’ची एखादी डॉक्टरेटही मिळू शकेल ! : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळमध्ये महाडिकांनी टँकरच्या माध्यमातून डल्ला मारल्याचा आरोप होतोय, मात्र महाडिकांना ‘गोकुळ’मधून मिळणारे उत्पन्न त्यांच्या उद्योगसमूहामधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या तीन टक्केदेखील नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिकांवर इतका अभ्यास केलाय की त्यांना एखादी ‘डॉक्टरेट’ही मिळू शकेल, असा टोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी लगावला. त्या आज… Continue reading ‘त्या’मुळेच पालकमंत्र्यांना ‘महाडिकांवर’ची एखादी डॉक्टरेटही मिळू शकेल ! : शौमिका महाडिक

श्री जोतिबाची यात्रा पूर्णपणे रद्द…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दख्खनचा राजा जोतिबा यात्रेवर या वर्षीही कोरोनाचे सावट पडले आहे. सोमवारी ही यात्रा मोजक्याच २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार होती. या मानकऱ्यांची कोरोना चाचणी घेतली असता यामध्ये पाच मानकऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जोतिबा डोंगराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली असून येथील सर्व रस्त्यावर बॅरीकेट्स लावली आहेत. त्यामुळे सोमवारी होणारी ही… Continue reading श्री जोतिबाची यात्रा पूर्णपणे रद्द…

‘गोकुळ’ घशात घालण्याचे महाडिकांचा डाव हाणून पाडला : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवून ‘गोकुळ’ घशात घालण्याचा महाडिकांचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई केली असे ना. सतेज पाटील यांनी गडहिंग्लजच्या मेळाव्यात सांगितले.  

व्यापाऱ्याची पैशाची बॅॅग लंपास करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील गंगावेश येथील व्यापाऱ्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील रोख ८० हजार आणि एका अंगठी असलेली बॅग लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री सापळा रचून अटक केली. गणेश नारायण सोळंखी (वय ४०) व वीरु दौलत सोळंखी (३६, दोघेही रा. मूळ गुजरात, सध्या रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची… Continue reading व्यापाऱ्याची पैशाची बॅॅग लंपास करणाऱ्या दोघांना अटक

सुळे येथे महिलेचा विनयभंग, मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा…

कळे (प्रतिनिधी) : घराच्या दारात पडलेले शेण काढण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याबद्दल दोघांवर कळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडित महिलेच्या वृद्ध सासू-सासऱ्यांनाही मारहाण केली आहे. सागर आनंदा पाटील आणि तेजस्विनी सागर पाटील (दोघेही रा. सुळे, ता. पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला. कळे पोलिसांकडून… Continue reading सुळे येथे महिलेचा विनयभंग, मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा…

error: Content is protected !!