टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली असुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लोकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिरोली एम.आय.डी सी पोलीस ठाण्याने बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या ठाण्याअंतर्गत शिरोली पुलाची, नागाव, मौजे वडगाव, टोप, कासारवाडी फाटा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काल रात्री विनामास्क फिरणाऱ्या ६६ नागरिकांना दंड केला आहे. मोटर व्हेईकल ॲक्ट प्रमाणे २० केसेस केल्या आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून चोवीस वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

मागील पंधरा दिवसात विनामास्क फिरनाऱ्या ३४६ जणांवर तसेच २०३ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.