बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर जगदीश लाड (वय ३४) याचे कोरोनामुळे निधन झाले. बडोद्यात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला ऑक्सिजनवर ठेवले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारा जगदीश लाड हा नवी मुंबईनंतर वडोदरा… Continue reading बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचा कोरोनामुळे मृत्यू

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने प्रसारमाध्यम क्षेत्रांत… Continue reading प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा : शिवसेना  

कोल्हापूर (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,  रेमडेसिविर बाजारात आणण्यासाठी  वितरक , डॉक्टर यांचा सहभाग आहे का ?  याचा कसून शोध घ्यावा आणि संबंधितावर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने व पदवी रद्द करण्याची मागणी  जिल्हा शिवसेनेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे केली.   याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले… Continue reading रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा : शिवसेना  

गोकुळ निवडणूक : आ. प्रकाश आवाडे यांचा सत्तारूढ गटाला पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना जोडण्यांना वेग आला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनीही सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे बाजू भक्कम झाल्याचा दावा सत्तारूढांनी केला आहे.  आवाडे यांच्या कोल्हापुरातील घरी… Continue reading गोकुळ निवडणूक : आ. प्रकाश आवाडे यांचा सत्तारूढ गटाला पाठिंबा

हातकणंगले येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्याला अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर काळ्या बाजाराने देशी बनावटीची दारू विकणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. राजकुमार अशोक घाटकर (रा. हातकणंगले)  अशी अटक केलेल्याचे नांव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून अंदाजे १५  हजार ६०० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत . ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस… Continue reading हातकणंगले येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्याला अटक

आणखी एका ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

आजरा (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना आणखी एका ठरावधारकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे ठरावधारक सज्जन विठोबा तोडकर (वय ७२) यांचे कोरोनामुळे निधन झाले. तोडकर यांच्यावर  गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.  गुरूवारी   त्यांची प्राणज्योत मावळली.  शेंद्री गावात त्यांनी सामाजिक व सहकार… Continue reading आणखी एका ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

पेठवडगाव येथे भाजप युवामोर्चातर्फे रक्तदान शिबिर  

हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुका भाजप युवामोर्चाच्या वतीने पेठवडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यांना दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराचे आयोजन युवामोर्चा तालुका अध्यक्ष सुहास जाधव,  बंडा गोंधकर, पियूष शहा, वडगाव युवामोर्चाचे अध्यक्ष रणजित पाटील, शहर अध्यक्ष जगन्नाथ  माने, महिला संयोजिका उमा… Continue reading पेठवडगाव येथे भाजप युवामोर्चातर्फे रक्तदान शिबिर  

…तर लवकरच धनंजय महाडिक तुरूंगात दिसतील : राजेखान जमादार

कागल (प्रतिनिधी) :  महालक्ष्मी दूध संघ अडचणीमध्ये आला त्याचे कारण म्हणजे राजकारण केले गेले. या संघाकडून कोणाचेही देणे शिल्लक राहिलेले नाही. दरम्यान, महालक्ष्मी दूध संघावर खोटेनाटे आरोप करणारे माजी खासदार धनंजय महाडिक भीमा साखर कारखान्यातील गैरव्यवहारामुळे नजीकच्या काळात तुरुंगातच दिसतील, असा दावा मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी… Continue reading …तर लवकरच धनंजय महाडिक तुरूंगात दिसतील : राजेखान जमादार

सादळे येथे लागलेल्या आगीत वनसंपदा नष्ट..

टोप (प्रतिनिधी) : कासारवाडी परिसरातील सादळे येथे आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास डोंगराला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा, शेकडो वृक्ष जळून खाक झाले. परंतु, अग्निशमन दल न पोहचल्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुमारे दहा ते पंधरा एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. डोंगराळ परिसरातील काही ठिकाणी गवत कापले नसल्यामुळे ही आग पसरत… Continue reading सादळे येथे लागलेल्या आगीत वनसंपदा नष्ट..

घरोघरी कोव्हिड तपासणी अभियान फायद्याचे : अश्विनी वरुटे

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या गावागावात कोरोना संसर्गाच्या तपासाची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोनाचे समूळ उच्चाटन करणे सोपे जाणार असल्याचे मत भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी वरुटे यांनी व्यक्त केले. यावेळी अश्वीनी वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भुदरगड तालुक्यातील ४१ गावात हे मोहीम राबवण्यात आली. तसेच गारगोटीमध्ये   कोव्हिडच्या तपासणी केल्या जात आहेत. यासाठी प्रत्येक गावातील नागरीकांना घरात… Continue reading घरोघरी कोव्हिड तपासणी अभियान फायद्याचे : अश्विनी वरुटे

error: Content is protected !!