हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुका भाजप युवामोर्चाच्या वतीने पेठवडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यांना दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिबिराचे आयोजन युवामोर्चा तालुका अध्यक्ष सुहास जाधव,  बंडा गोंधकर, पियूष शहा, वडगाव युवामोर्चाचे अध्यक्ष रणजित पाटील, शहर अध्यक्ष जगन्नाथ  माने, महिला संयोजिका उमा ठिगळे,  हुपरी युवामोर्चाचे अध्यक्ष समीर मुजावर आदी कार्यकर्त्यांनी केले.