महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदी मुदतवाढ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रशासक पदास मुदतवाढ मिळाली आहे. शासनाच्या वतीने आज (शुक्रवार) आदेश काढण्यात आले आहेत. ही मुदतवाढ महापालिका आगामी निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेपर्यंत असणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही… Continue reading महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदी मुदतवाढ…

पन्हाळा शहरात ३ मे पासून १० दिवस लॉकडाऊन…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी ३ मे ते १२ मे या कालवधीत पूर्णपणे १० दिवसांसाठी पन्हाळा बंद केला आहे.    पन्हाळा शहरामध्ये एप्रिल महिन्यांपासून कोरोनाचे ५० रुग्ण सापडले आहेत. त्यातील १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एका रुग्णाचा… Continue reading पन्हाळा शहरात ३ मे पासून १० दिवस लॉकडाऊन…

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : वैभव नावडकर (व्हिडिओ)

दोन मे रोजी होणाऱ्या ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.  

कोरोनाने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने तरुणाचाही मृत्यू : शाहूवाडी तालुक्यातील दुर्दैवी प्रकार   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर पुण्यातील एक तरुण आपल्या पत्नी, मुलांसह गावी परततो. पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान होते, उपचार सुरू होतात, ते दोघेही उपचाराला प्रतिसाद देत असतात, मात्र अचानक पत्नीची तब्येत खालावते आणि तिचा मृत्यू होतो. पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने दोनच दिवसांत त्या तरुणाचाही मृत्यू होतो… दोन्ही छोट्या मुलांचं छत्र हरपतं आणि… Continue reading कोरोनाने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने तरुणाचाही मृत्यू : शाहूवाडी तालुक्यातील दुर्दैवी प्रकार   

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना निषेधार्थ आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास कायदा हातात घेऊ नये. नागरिकांनी त्याबाबत प्रशासनाकडे दाद मागावी. अथवा थेट माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले आहे. कोरोनाच्या… Continue reading डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा : आ. चंद्रकांत जाधव

स्मॅक, औद्योगिक विकास महामंडळाच्या शिबिरात ३०५ जणांचे लसीकरण

टोप (प्रतिनिधी) : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राम प्रताप झंवर सभागृह येथे आयोजित केलेले रॅपिड अँटीजन टेस्ट व लसीकरण कॅम्पमध्ये आज अखेर १ हजार ३६९ जणांनी रॅपिड अँटीजन टेस्ट आणि ३०५ जणांचे लसीकरण करण्यात आले.  जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची यांच्या सहकार्याने… Continue reading स्मॅक, औद्योगिक विकास महामंडळाच्या शिबिरात ३०५ जणांचे लसीकरण

इचलकरंजीत ‘संजय गांधी निराधार’ अनुदान वाटपास सुरुवात : लाभार्थ्यांत समाधान (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता हे कडक निर्बंध १५ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. यापूर्वी राज्य शासनाने ३१ मार्च रोजी निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार इचलकरंजीतील कष्टकरी व हातावर पोट असलेल्या नागरिकांना… Continue reading इचलकरंजीत ‘संजय गांधी निराधार’ अनुदान वाटपास सुरुवात : लाभार्थ्यांत समाधान (व्हिडिओ)

राजेंद्रनगर झोपडपट्टीतील ९ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजेंद्रनगर झोपडपट्टीतील ६९ नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट आज (शुक्रवार) करण्यात आली. यामध्ये  ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र, शहरात… Continue reading राजेंद्रनगर झोपडपट्टीतील ९ जणांना कोरोनाची लागण

विरोधकांच्या आरोपांमध्ये एक टक्काही दम नाही… : आ. पी. एन. पाटील (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघ आम्ही शेतकऱ्यांसाठीच चालवलाय. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये एक टक्काही दम नाही, आम्ही पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वास राजर्षी शाहू आघाडीचे नेते, आ. पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.  

 ‘या’ ७० केंद्रावर होणार ‘गोकुळ’चे मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी (दि.२) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ तालुक्यात एकूण ७० केंद्र निश्चित करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर ५० मतदारांचे मतदान होणार आहे, अशी माहिती करवीर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.   गोकुळसाठी एकूण ३६५६ पात्र मतदार होते. त्यापैकी… Continue reading  ‘या’ ७० केंद्रावर होणार ‘गोकुळ’चे मतदान

error: Content is protected !!