मुंबई (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर जगदीश लाड (वय ३४) याचे कोरोनामुळे निधन झाले. बडोद्यात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला ऑक्सिजनवर ठेवले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारा जगदीश लाड हा नवी मुंबईनंतर वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे तो स्वत:ची व्यायामशाळा चालवत होता. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवले होते. मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्यांने दोन वेळा गोल्ड मेडल पटकावले होते. तर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते.