टोप (प्रतिनिधी) : कासारवाडी परिसरातील सादळे येथे आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास डोंगराला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा, शेकडो वृक्ष जळून खाक झाले. परंतु, अग्निशमन दल न पोहचल्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये सुमारे दहा ते पंधरा एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. डोंगराळ परिसरातील काही ठिकाणी गवत कापले नसल्यामुळे ही आग पसरत गेली. ही आग सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातून निगडे परिसरात आली. पण या डोंगराला वारंवार आग लागण्याची घटना घडत असून याकडे सामाजिक वनिकरण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.