गडहिंग्लजमध्ये पालकमंत्र्यांचा नगरसेवक, जि.प. सदस्यांशी संवाद  

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या गाठीभेटींना जिल्ह्यात वेग आलाय. आज गडहिंग्लज शहरातील नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी संवाद साधला. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्या घरी ही बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे… Continue reading गडहिंग्लजमध्ये पालकमंत्र्यांचा नगरसेवक, जि.प. सदस्यांशी संवाद  

मी माझ्या बापाचं नाव लावतो : विक्रम गोखलेंचा रोख कुणाकडे ?  

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावतच्या विधानाचे समर्थन केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे. शाहरुखचं नव्हे तर बॉलिवूड मधील कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. मी माझ्या बापाचं नाव लावतो. आर्यन खान हा अत्यंत फालतू विषय होता. असे… Continue reading मी माझ्या बापाचं नाव लावतो : विक्रम गोखलेंचा रोख कुणाकडे ?  

राहुल आवाडेंना लोकसभेचा शब्द…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळेच राहुल आवाडे यांच्याऐवजी माजी आ. अमल महाडिक यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे… Continue reading राहुल आवाडेंना लोकसभेचा शब्द…

आंदोलन तत्काळ मागे घेणार नाही : राकेश टिकैत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु आंदोलन तत्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील, त्या दिवसाची वाट पाहू. एमएसपीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही सरकारने चर्चा करावी, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंमबरम यांनी म्हटले आहे की, लोकशाही आंदोलनातून… Continue reading आंदोलन तत्काळ मागे घेणार नाही : राकेश टिकैत  

शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराची मान झुकवली : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  (शुक्रवार) नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. तर पंतप्रधानांच्या घोषणेनंतर  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले  आहे की, देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाच्या माध्यमातून अहंकाराची मान… Continue reading शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराची मान झुकवली : राहुल गांधी

कोल्हापुरी ठसका : विधान परिषदेची निवडणूक एक जुगार..!

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी कागदोपत्री लढत होणार असली, तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबातील अंतर्गत संघर्ष हाच लढतीचा मुद्दा अधोरेखित असणार आहे. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे एक जुगार आहे. त्यात मतदार हरणार नाहीत, तर मालामाल होणार हे नक्की… विधान परिषदेच्या… Continue reading कोल्हापुरी ठसका : विधान परिषदेची निवडणूक एक जुगार..!

मोदींची मोठी घोषणा : अखेर तीन कृषी कायदे रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी बहुचर्चित तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गेली वर्षभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. पंतप्रधानांनी  देशाला संबोधित करताना  या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की,  तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले.… Continue reading मोदींची मोठी घोषणा : अखेर तीन कृषी कायदे रद्द

ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, माजी आ. संजय घाटगे यांचा एकोपा…

कागल (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक आणि माजी आ. संजयबाबा घाटगे या तीन नेत्यांचा एकोपा घडून आला आहे. यावेळी कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते ना. सतेज  पाटील यांना मिळणार आहेत.… Continue reading ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, माजी आ. संजय घाटगे यांचा एकोपा…

इचलकरंजी येथे वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाखांची वीजचोरी   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील दोन यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीज मीटरमध्ये वीज वापराचे रिडींग दिसू नये, या हेतूने वीजमीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून मीटर डिस्प्ले बंद केला आहे.  या ग्राहकांविरूध्द वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाख रूपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. महावितरणच्या… Continue reading इचलकरंजी येथे वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाखांची वीजचोरी   

कोल्हापुरात मंगळवारी ‘ओम महामंत्र का उच्चारण’ कार्यक्रम 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानच्या वतीने कोल्हापुरात प्रथमत ‘ओम महामंत्र का उच्चारण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२३) शाहू स्मारक भवन येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आणि बुधवारी (दि. २४) सेंट्रल पंचायत हॉल, गांधीनगर, येथे संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत विनामूल्य हा कार्यक्रम… Continue reading कोल्हापुरात मंगळवारी ‘ओम महामंत्र का उच्चारण’ कार्यक्रम 

error: Content is protected !!