नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु आंदोलन तत्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील, त्या दिवसाची वाट पाहू. एमएसपीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही सरकारने चर्चा करावी, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

माजी अर्थमंत्री पी चिदंमबरम यांनी म्हटले आहे की, लोकशाही आंदोलनातून जे साध्य होऊ शकत नाही ते आगामी निवडणुकांच्या भीतीने साध्य होऊ शकते. तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा धोरण बदलून किंवा हृदयपरिवर्तनाने प्रेरित नाही. असो, हा शेतकऱ्यांचा आणि शेती कायद्याला अविचल विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा मोठा विजय आहे.