गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या गाठीभेटींना जिल्ह्यात वेग आलाय. आज गडहिंग्लज शहरातील नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी संवाद साधला.

माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्या घरी ही बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम, सुरेशआण्णा कोळकी, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, उमेश आपटे, नगरसेविका रुपाली परीट,  रेश्मा कांबळे, सावित्री पाटील, शुभदा पाटील, नगरसेवक दिपक कुराडे, हरुण सय्यद, संभाजीराव भोकरे आदी उपस्थित होते.