राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) ; राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील… Continue reading राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू : मुख्यमंत्री

न्यू कॉलेज येथे ४१ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला सुरुवात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने न्यू कॉलेज येथे ४१ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) करण्यात आले. या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या आधिपत्याखालील ५४  महाविद्यालयांचे ९६० कलाकार विद्यार्थी सहभागी झाले असून २० पेक्षा अधिक कला या महोत्सवात सादर होणार आहेत.… Continue reading न्यू कॉलेज येथे ४१ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला सुरुवात…

जिल्हा बँकेसाठी उद्यापासून सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा धुरळा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी ५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत छ. शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ उद्या (शनिवार) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रचार मेळावे सुरू होणार आहेत. या तालुकानिहाय मेळाव्यांना माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे,  आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील,… Continue reading जिल्हा बँकेसाठी उद्यापासून सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा धुरळा…

इचलकरंजी लालबावटा युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मजूरी वाढ घोषित करा. अशी मागणी आज (शुक्रवार) लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्या कार्यालयात शॉप इन्स्पेक्टर श्रीमती लोहार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २०१३ साली झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी यंत्रमाग उद्योगातील कामगारांची… Continue reading इचलकरंजी लालबावटा युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन…

गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन पर्यावरणपूरक: आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे पुष्पप्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आले. हे पुष्प प्रदर्शन पर्यावरणपूरक असल्याचे प्रतिपादन पालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्रीमती शांतादेवी पाटील, अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, डॉ. संग्राम… Continue reading गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन पर्यावरणपूरक: आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

मणेर मस्जिद रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकर करावे : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेमधील क्षीरसागर चौक ते पापाची तिकटी, हंकारे हॉटेल ते मणेर मस्जिद रस्ता गेली अनेक वर्षे खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.  त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. तर अनेक अपघातही या खड्ड्यांमुळे घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे लवकर डांबरीकरण करावे. अशी मागणी बुधवार… Continue reading मणेर मस्जिद रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकर करावे : शिवसेनेची मागणी

टोप येथील छ. राजाराम सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी चौगले बिनविरोध…

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील छ.राजाराम सोसायटीत शिवाजी चौगले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेची १२ वर्षानंतर निवडणुक लागली होती. त्यामध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. यामध्ये सत्ताधारी आघाडीस धक्का देत परिवर्तन आघाडीने १५ जागा जिकत आपले निर्विवाद वर्चस्व केले होते. आज (शुक्रवार) सकाळी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चेअरमन… Continue reading टोप येथील छ. राजाराम सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी चौगले बिनविरोध…

मुरुक्टे येथे नुतन सदस्या रंजना कांबळे यांचा सत्कार…

पिंपळगाव (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील मुरुक्टे येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नुतन सदस्या रंजना कांबळे यांचा गोकुळ संचालक रणजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सभापती धोंडीराम वारके,बापूसाहेब आरडे,उपसरपंच दयानंद ऱ्हाटवळ, सदस्य अरुण बेलेकर, प्रकाश भोसले,मारुती कांबळे,निवृत्ती माने, बाळकृष्ण आडसुळ, लक्ष्मण माने, अशोक पोवार, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

सादळे-मादळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अमिर पटेल विजयी…

टोप (प्रतिनिधी) : सादळे-मादळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अमिर पटेल हे विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनचे सदस्य वसंत मारुती कोरवी यांचे निधन झाल्याने या रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती.   प्रभाग क्रमांक तीन हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होता. या निवडणुकीत अमिर धोंडीबा पटेल आणि दत्तात्रय बाजीराव शिंदे हे दोन उमेदवार… Continue reading सादळे-मादळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अमिर पटेल विजयी…

संभापुरचे नाव लवकरच देशात नावारुपाला येणार : भास्कर पेरे-पाटील

टोप (प्रतिनिधी) : संभापुरचा विकासाचा वेग पहाता लवकरच हे गाव जिल्ह्यासह देशात नावारुपाला येईल असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कास विजेते सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले. ते संभापुर येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बोलत होते. यावेळी भास्कर पाटील यांनी, गावामध्ये शुद्ध हवा, पाणी गरजेचे असुन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याबाबत सांगितले. गाव स्वच्छतेसाठी श़ंभर टक्के शौचालयाचा वापर करा, यामुळे… Continue reading संभापुरचे नाव लवकरच देशात नावारुपाला येणार : भास्कर पेरे-पाटील

error: Content is protected !!