गणेशवाडीच्या ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत प्रवीण शिरगावे यांचा विजय…

गणेशवाडी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या पोटनिवडणुकीत प्रवीण देवगोंडा शिरगावे यांनी विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी गटाचे राजेंद्र देवताळे यांचा पराभव झाला आहे. विजयानंतर शिरगावे गटाचे समर्थक कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून जल्लोष केला. प्रभाग क्रमांक तीन मध्ये गत निवडणुकीत भारत मारुती गुरव हे विजयी झाले होते. विजयानंतर… Continue reading गणेशवाडीच्या ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत प्रवीण शिरगावे यांचा विजय…

कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेला शासनाच्या विविध विकास योजनेतून ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मूलभूत सेवासुविधा, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनच्या मोटारसायकल आदींचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी दिली. दिपक गायकवाड म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेतून २ कोटी २५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील १ कोटी… Continue reading कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील अथणी शुगर्सकडून अंतुर्ली ग्रामपंचायतीचा सन २०१६-१७ पासुन थकीत असलेला  कर भरण्यात आला. या थकीत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांनी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली होती. पण भुदरगडच्या तहसीलदारांनी यात यशस्वी शिष्टाई केल्यानंतर कारखान्याने ग्रामपंचायत कर भरला. त्यामुळे ग्रामस्थांनी कारखाना व भुदरगड प्रशासनाचे आभार मानले आहेत. थकीत ग्रामपंचायत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांच्या… Continue reading अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

शाहुवाडीतील ‘या’ नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील तीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आज (गुरुवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यशवंत बापू नलवडे (वय ५१, रा. सावे, ता.शाहुवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. सावे येथे यशवंत नलवडे हा… Continue reading शाहुवाडीतील ‘या’ नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा…

गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रे याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळाला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील अंबाई टँक परिसरात केलेल्या बेछूट गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रे (वय ३५,  रा. अंबाई टँक, कोल्हापूर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळला. मानसिंग बोंद्रे याने अंबाई टँक कॉलनी परिसरात मध्यरात्री गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अभिषेक बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, कोल्हापूर) यांनी… Continue reading गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रे याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळाला…

‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोडपैकी कुरणेवाडी येथे आठ दिवसापूर्वी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यालगत असलेला विद्युत वाहक पोल मोडला होता.‌ तरीही या पोलवरून कुरणेवाडी आणि तेली वसाहत येथे विद्युत पुरवठा सुरू होता. यासंदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने २० डिसेंबर रोजी हा संबंधित पोल बदलण्या संदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

भालकर्स कला अकादमीची गुरु-शिष्य अभिनय कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्य गुरू-शिष्य अभिनय कार्यशाळाचे आयोजन केले होते.  या कार्यशाळेची सुरूवात यशवंत भालकर यांच्या फोटोला हार तसेच नटराजाचे पुजन करून करण्यात आले. यावेळी अर्किटेक्ट चंदन मिरजकर, कलाप्रेमी उद्योजक सिध्दार्थ साळोखे, प्रा. पाठारे यांच्या उपस्थित या कार्यशाळेला सुरूवात झाली. यावेळी नाट्यकर्मी संजय हळदीकर यांनी, अभिनय जगताना आणि अभिनेता… Continue reading भालकर्स कला अकादमीची गुरु-शिष्य अभिनय कार्यशाळा संपन्न…

वेतवडेतील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत ढासळली : शालेय प्रशासनाचे दुर्लक्ष 

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारातील संरक्षण भिंत गेल्या एक वर्षापासून ढासळलेल्या अवस्थेत आहे. मात्र, याकडे शालेय प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ही शाळा एका टेकडीवर असून येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. तसेच  मुख्य रस्त्यापासून सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीवर ही शाळा आहे.… Continue reading वेतवडेतील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत ढासळली : शालेय प्रशासनाचे दुर्लक्ष 

आजरा येथे अग्निशामक वाहन खरेदीसाठी ६० लाखांचा निधी मंजूर…

आजरा (प्रतिनिधी) :आजरा नगरपंचायत शहर व तालुक्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून अग्निशामक वाहन खरेदीसाठी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जि.ष.चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या विशेष प्रयत्ननातून हा निधी मंजूर झाल्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी सांगितले. या कामासाठी अशोकआण्णा चराटी, नगराध्यक्षा ज्योस्तना चराटी, सर्व नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. या गाडीचा वापर… Continue reading आजरा येथे अग्निशामक वाहन खरेदीसाठी ६० लाखांचा निधी मंजूर…

गव्हर्न्मंट सर्व्हंट्स बँकेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणूक प्रकरणी गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेशाचे उल्लंघन करत विना परवाना गव्हर्न्मंट सर्व्हंट्स बँकेच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. या प्रकरणी मिरवणूक आयोजकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब खडके (रा. कळंबा तर्फ ठाणे) संभाजी पाटील (हनुमाननगर, शाहू नाका, कोल्हापूर) रामदास कांबळे (वारणा कॉलनी, कोल्हापूर) संजय इंगवले (सडोली खालसा, करवीर) धनाजी उलपे… Continue reading गव्हर्न्मंट सर्व्हंट्स बँकेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणूक प्रकरणी गुन्हा

error: Content is protected !!