टोप (प्रतिनिधी) : टोप येथील छ.राजाराम सोसायटीत शिवाजी चौगले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेची १२ वर्षानंतर निवडणुक लागली होती. त्यामध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. यामध्ये सत्ताधारी आघाडीस धक्का देत परिवर्तन आघाडीने १५ जागा जिकत आपले निर्विवाद वर्चस्व केले होते.

आज (शुक्रवार) सकाळी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चेअरमन पदासाठी शिवाजी चौगले यांना संचालक विठ्ठलपंत पाटील यांनी अनुमोदन केले. तर सदाशीव पोवार यांना व्हा.चेअरमन पदासाठी पिलाजी पाटील यांनी अनुमोदन केले. यावेळी सर्व संचालकांनी याला एकमुखी पाठींबा दिला. यानंतर निवडणुक अधिकारी प्रगती बागल यांनी शिवाजी चौगुले यांना चेअरमनपदी तर सदाशीव पोवार व्हा. चेअरमन पदी निवड झालेचे जाहिर केले. यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी मकसुद शिंधी यांनी काम पाहिले. या निवडीनंतर कार्यकर्त्यानी गुलालाची उधळन करत फटाक्याची आतिषबाजी केली. तसेच तज्ज्ञ संचालक म्हणून विनोद भोसले आणि ज्ञानदेव पाटील यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी रामचंद्र पाटील, दिलिप पाटील, मुकुंद पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, अभिजित मुळीक, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.