टोप (प्रतिनिधी) : संभापुरचा विकासाचा वेग पहाता लवकरच हे गाव जिल्ह्यासह देशात नावारुपाला येईल असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कास विजेते सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले. ते संभापुर येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी भास्कर पाटील यांनी, गावामध्ये शुद्ध हवा, पाणी गरजेचे असुन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याबाबत सांगितले. गाव स्वच्छतेसाठी श़ंभर टक्के शौचालयाचा वापर करा, यामुळे उत्तम आरोग्य लाभेल. रोजगार, व्यवसाय, व्यापार आणि उत्पन्नाच्या संधी गावातल्या गावातच उपलब्ध होतील. यामुळे गावं समृद्ध होवुन गावासोबत लोकांचेही कल्याण होणार असल्याचे सांगितले. तर संभापुर गावात झालेल्या विकासकामे आणि सुविधांचे कौतुक केले. यावेळी विविध विकासमे केल्याबद्दल सरपंच प्रकाश झिरंगे, उपसरपंच स्वरूप भोसले, सर्व ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी, ग्रामसेविका आसमा मुल्लांनी यांचा पेरे-पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच मारूती भोसले, तानाजी भोसले, सर्जेराव भोसले, देवदुत झिरंगे, पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.