कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी ५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत छ. शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ उद्या (शनिवार) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रचार मेळावे सुरू होणार आहेत.

या तालुकानिहाय मेळाव्यांना माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे,  आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील, आ. डॉ. विनय कोरे, माजी आ. महादेवराव महाडिक, आ. राजेश पाटील, माजी आ. बजरंगअण्णा देसाई, माजी आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आ. के. पी. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आ. संजयबाबा घाटगे, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, माजी आ. दिनकरराव जाधव, माजी आ. श्रीपतराव शिंदे, माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या प्रचार मेळाव्यांच्या तालुकानिहाय दिवस,  तारखा आणि वेळा अशा आहेत…

शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ –  

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गडहिंग्लज तालुक्याचा मेळावा गडहिंग्लज शहरातील गिजवणे रोडवरील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे.

बुधवार २९ डिसेंबर २०२१ –   

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करवीर तालुका, कोल्हापूर शहर व गगनबावडा तालुका यांचा संयुक्त मेळावा होणार आहे. कागल तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

 गुरूवार दि. ३० डिसेंबर २०२१ – 

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हातकणंगले तालुक्याचा मेळावा होणार आहे. शिरोळ तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

 शुक्रवार दि. ३१ डिसेंबर २०२१ –

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पन्हाळा तालुक्याचा मेळावा होणार आहे. शाहूवाडी तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

शनिवार १ जानेवारी २०२२ –

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राधानगरी तालुक्याचा मेळावा होणार आहे. भुदरगड तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

रविवार २ जानेवारी २०२२ –

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चंदगड तालुक्याचा मेळावा होणार आहे. आजरा तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

त्यामुळे उद्यापासून जिल्हा बँकेसाठी सर्व मातब्बर नेते मंडळी प्रचाराचा धुरळा उडवणार हे नक्की…