कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने न्यू कॉलेज येथे ४१ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) करण्यात आले.

या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या आधिपत्याखालील ५४  महाविद्यालयांचे ९६० कलाकार विद्यार्थी सहभागी झाले असून २० पेक्षा अधिक कला या महोत्सवात सादर होणार आहेत. यावेळी हुतात्मा किसन साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभवकाका नायकवडी, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन के.जी. पाटील, विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.