शाहू महाराजांनी सामाजिक समता रुजवली : डॉ. टी. एस. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साऱ्या देशाला समानतेचा मानवतेचा संदेश देऊन सामाजिक समता आणण्याचे काम केले. सगळा जातिभेद तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि बहुजन समाज एकच असल्याचे सिद्ध केले, असे  प्रतिपादन विचारवंत डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात ३१ ऑगस्ट १९५३ रोजी भटक्या विमुक्त जाती जमातींना… Continue reading शाहू महाराजांनी सामाजिक समता रुजवली : डॉ. टी. एस. पाटील

तरुणाचा जिल्हाधिकारी दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच ही धक्कादायक घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. परशुराम नामदेव कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी… Continue reading तरुणाचा जिल्हाधिकारी दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांनी जागवल्या विद्यार्थी चळवळीतील आठवणी

सोलापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रिय चळवळीतून राजकारणात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. विद्यार्थी चळवळीत राज्यातील अनेक विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावर त्यांनी केलेल्या आंदोलन-उपक्रमांची आठवण त्यांना झाली. त्या आठवणी जागवताना त्यांनी नव्याने जबाबदारी घेतलेल्या खात्याच्या माध्यमातून बेरोजगारीवर परिणामकारक… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी जागवल्या विद्यार्थी चळवळीतील आठवणी

‘शाहू’ची काजळी, दूषित पाणी बंद न झाल्यास आंदोलन : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याची काजळी आणि विषारी दूषित पाण्यामुळे कागल शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी समरजित घाटगे यांची इच्छा असेल, तर त्यांना भेटून चर्चेची तयारी आहे. ही काजळी आणि दूषित पाणी थांबले नाही, तर मात्र लोकप्रतिनिधी म्हणून मला आंदोलनच उभारावे लागेल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. येथील… Continue reading ‘शाहू’ची काजळी, दूषित पाणी बंद न झाल्यास आंदोलन : मुश्रीफ

ध्वनिवर्धक, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी : राहुल रेखावार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणरायाच्या आगमनादिवशी (बुधवारी) कोल्हापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याबाबत १४ सुटीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून, यानुसार… Continue reading ध्वनिवर्धक, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी : राहुल रेखावार

अवघी करवीर नगरी झाली गणेशमय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विघ्नाहर्त्या गणेशाचे जल्लोषी स्वागतासाठी करवीर नगरीसह जिल्ह्यात सर्व तयारी होत आली असून, सर्वत्र आगमनाची लगबग सुरु आहे. कोरोना काळातील सर्व विघ्नांवर मात करत बाप्पांच्या आगमनाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अवघी करवीर नगरी गणेशमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरु असून, काही भाविकांनी… Continue reading अवघी करवीर नगरी झाली गणेशमय

कागलमध्ये राधाकृष्ण मंदिराच्या किचन शेडचे भूमिपूजन

कागल (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात राधा-कृष्ण मंदिरांची संख्या विरळच आहे. कागलला पुरातन काळापासून असलेल्या राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भाग्य मला मिळाले, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. मंदिरे आणि देव देवतांमुळेच समाजस्वास्थ्य अबाधित आहे, असेही ते म्हणाले. कागलच्या राधाकृष्ण मंदिर परिसरातील ६३ लाख खर्चाच्या किचन शेडचे भूमिपूजन आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ… Continue reading कागलमध्ये राधाकृष्ण मंदिराच्या किचन शेडचे भूमिपूजन

डॉ. सुनीलकुमार लवटेंचा ९ ऑक्टोबरला नागरी सत्कार

कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत व समाजसेवक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली. प्राचार्य माळी यांनी सांगितले की,… Continue reading डॉ. सुनीलकुमार लवटेंचा ९ ऑक्टोबरला नागरी सत्कार

वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता कमाल आर खानला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विटवरुन नेहमीच चर्चेत असतो. केआरकेला वादग्रस्त ट्विट करणे महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबईच्या मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. केआरकेविरोधात मालाड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. दोन… Continue reading वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता कमाल आर खानला अटक

परप्रांतीयांचे लोंढे कसे रोखणार ?

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : शहराची हद्दवाढ झाल्यावर या भागात परप्रांतीयांचे लोंढे यायला नक्कीच सुरुवात होणार आहे. तसा अन्य शहरांचा अनुभव आहे. केवळ पुण्याचा विचार केला, तर आज तिथली परिस्थिती काय आहे. फक्त गर्दी आणि गर्दी. वाहनांची, माणसांची, उड्डाणपुलांची, आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या इमारतींची गर्दी दिसते. भाजीपाला, दूध असो वा मटण-मच्छी त्याचे दर पुण्यात काय आहेत.… Continue reading परप्रांतीयांचे लोंढे कसे रोखणार ?

error: Content is protected !!