कागल (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात राधा-कृष्ण मंदिरांची संख्या विरळच आहे. कागलला पुरातन काळापासून असलेल्या राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भाग्य मला मिळाले, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. मंदिरे आणि देव देवतांमुळेच समाजस्वास्थ्य अबाधित आहे, असेही ते म्हणाले.

कागलच्या राधाकृष्ण मंदिर परिसरातील ६३ लाख खर्चाच्या किचन शेडचे भूमिपूजन आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक तात्यासाहेब पाटील होते. प्रारंभी लिंगनूर दुमालाच्या विठ्ठल भजनी मंडळाच्या गजरात भक्तिमय दिंडी काढण्यात आली. यामध्ये आ. मुश्रीफ गळ्यात वीणा घेऊन वारकऱ्यांसमवेत चालत राहिले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव पाटील यांनी, पंढरपूर भक्त निवास बांधण्यासाठी मुश्रीफ यांनी लक्ष घालावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी केली. प्रवीण काळबर म्हणाले, चौफेर विकासमुळे भविष्यात पर्यटनासाठी लोक कागल शहरात येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मुश्रीफ यांनी ही सर्व कामे केली आहेत.

आमदार मुश्रीफ यांनी आजवर सातशेहून अधिक मंदिरे बांधली आहेत.आता मंदिराचा किचन हॉल ६३ लाख रुपये खर्चातून होत असल्यामुळे श्री कृष्णाच्या आशीर्वादाने ते उपमुख्यमंत्री होतील, असा आशावाद राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त बबलू पाटील व्यक्त केला.

प्रकाश गाडेकर म्हणाले, कागल शहरातील सर्व मंदिराचा जीर्णोध्दार मुश्रीफ यांनी केला. त्यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात ९५ कोटी रुपयांचा निधी कागल शहराच्या विकासासाठी आणला आहे.  कार्यक्रमास संगीता बाबासाहेब पाटील,  तृप्ती सौरभ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, तात्यासो पाटील, सौरभ पाटील, निशांत जाधव, विवेक लोटे, चंद्रकांत गवळी, नवल बोते, हिंदुराव पाटील, माधवी मोरबाळे, अस्लम मुजावर,  ॲड. संग्राम गुरव, प्रमोद पाटील, दत्ता चव्हाण, इरफान मुजावर, संजय ठाणेकर, नवाज मुश्रीफ, बबलू पाटील, अविनाश घाटगे, सचिन कोळी आदी उपस्थित होते.