मेट्रो प्रकल्पावरून राजकीय प्रदूषणच जास्त झाले : मुख्यमंत्री

मुंबई : मेट्रो प्रकल्पावरून राजकीय प्रदूषणच अधिक झाले. त्यामुळे हा प्रकल्प रखडला. आता या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील कुलाबा-सिप्झ या पहिल्या भुयारी मेट्रोची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या झाली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मेट्रो प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे… Continue reading मेट्रो प्रकल्पावरून राजकीय प्रदूषणच जास्त झाले : मुख्यमंत्री

‘सुबुद्धी दे गणनायका’

श्रीधर वि. कुलकर्णी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. घरोघरी गणपती बसविण्यामागे समाजातील ऐक्य साधण्याबरोबरच घरात हे संस्कार होत राहावेत, हाही मोठा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता. घराचे घरपण व समाजाचे सामाजिक स्वरूप एकत्रितपणे अबाधित राहावे हा त्यामागचा आणखी एक व्यापक हेतू होता. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून… Continue reading ‘सुबुद्धी दे गणनायका’

पिक्चर अभी बाकी है..! : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दुध संघाची सभा आज (सोमवार) पार पडली. या सभेत जे सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित होतं तेच झाले.  सत्ताधाऱ्यांनी सकाळपासूनच बोगस सभासद आतमध्ये आणून बसवले. मी माझ्या समर्थक आणि ठरावधारकांसह सभेला गेले असता, हॉल पूर्ण भरला होता. बोगस आणि ढिसाळ नियोजनामुळेच सभासदांना उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे मी स्टेजवर न जाता त्यांच्यासोबत खालीच… Continue reading पिक्चर अभी बाकी है..! : शौमिका महाडिक

भाजपचे ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत  : शरद पवार

ठाणे : राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाहीत. पुढच्या निवडणुकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले. आता २०२३ साठी आता ५ ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष… Continue reading भाजपचे ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत  : शरद पवार

शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार : उद्धव ठाकरे

मुंबई : यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. कुणी कितीही संभ्रम निर्माण करु देत, शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन… Continue reading शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार : उद्धव ठाकरे

हातकणंगले येथे तालुका विभाजनाविरोधात गाव बंद, रस्ता रोको

कुंभोज (प्रतिनिधी) :  विरोधी कृती समितीमार्फत हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तालुका विभाजनाचा निषेध करण्यात आला. हातकणंगले परिसरातील नागरिकांच्या वतीने तालुका विभाजनाच्या निर्णयाविरुद्ध गाव बंद ठेवण्यात आले. शिवाय कोल्हापूर-सांगली महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, हातकणंगले तालुक्यात एकूण ६२ गावांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये… Continue reading हातकणंगले येथे तालुका विभाजनाविरोधात गाव बंद, रस्ता रोको

डान्स ग्रुप, दिग्दर्शकांवर कारवाई करण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात जनतेसमोर नंगानाच करणाऱ्या डान्स ग्रुपवर व दिग्दर्शक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत-मांडरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन महिला शिष्टमंडळातर्फे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ग्रामीण भागात काही स्वयंघोषित नृत्य दिग्दर्शक मुलींच्या माध्यमातून नंगानाच करत आहेत.… Continue reading डान्स ग्रुप, दिग्दर्शकांवर कारवाई करण्याची मागणी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयामध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे अधिष्ठाता व जिमखाना… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन

‘डी. वाय.’अभियांत्रिकी कॉलेज ‘बेस्ट ऑटोनॉमस’ने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या ३८ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप ‘नवभारत’च्या वतीने कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘बेस्ट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ द इअर’ म्हणून, तर डी. वाय. पाटील ग्रुपला ‘लार्जेस्ट चेन ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन… Continue reading ‘डी. वाय.’अभियांत्रिकी कॉलेज ‘बेस्ट ऑटोनॉमस’ने सन्मानित

‘शाहू’ला सर्वोत्कृष्ट को-जन. पॉवर प्लान्टसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार

कागल (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास सन २०२१- २२ चा देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचा सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लान्टसाठीचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील, संजय नरके, कार्यकारी… Continue reading ‘शाहू’ला सर्वोत्कृष्ट को-जन. पॉवर प्लान्टसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार

error: Content is protected !!