सोलापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रिय चळवळीतून राजकारणात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले.

विद्यार्थी चळवळीत राज्यातील अनेक विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावर त्यांनी केलेल्या आंदोलन-उपक्रमांची आठवण त्यांना झाली. त्या आठवणी जागवताना त्यांनी नव्याने जबाबदारी घेतलेल्या खात्याच्या माध्यमातून बेरोजगारीवर परिणामकारक उपाय ठरणारे आणि महाराष्ट्रात नवे लघुउद्योजक व व्यावसायिक घडविणारे कौशल्य विकास अभ्यासक्रम विकसित करणार असल्याचेही आवर्जून सांगितले.

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व भाजप युवा नेते मोहन डांगरे यांच्या हस्ते चंद्रकांतदादांचा विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या वाटचाल व उद्दिष्टांची माहिती दिली. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत माने उपस्थित होते.

या उपक्रमाचे संयोजक राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष मुरलीधर चव्हाण, अमित इंगोले, रोहन नलावडे, जिल्हा सहसचिव विनोद ननवरे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, खजिनदार विकास कस्तुरे, बार्शी तालुका अध्यक्ष अजय पाटील, सोलापूर शहर, कार्यकारणी सदस्य मनोज भालेराव, सचिन जाधव, योगेश कल्याणकर मोहसीन मुलाणी, सिद्धेश्वर माने, दादासाहेब कोडग, दिनेश मडके, हर्षल गाडे आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.